मुंबईः भिवंडीतील वीज ग्राहकांना गेल्या 6 महिन्यापासून टोरंट वीज कंपनी कडून वाढीव वीज बिल पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज दुपारी आक्रमक पावित्रा घेतला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीतील अंजूर फाटा ओसवाल वाडी येथे असलेल्या वीज कंपनीच्या कार्यालयावर हल्ला केला आहे. या तोडफोडीत कार्यकर्त्यांनी दरवाजाच्या काचा फोडून वीज कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध केला आहे.
शहरातील अंजूरफाटा येथील ओसवालवाडी येथे टोरंट वीज कंपनीचे ग्राहक सुविधा केंद्र आहे. तेथे वीज बील भरण्याचे काम होत असते. कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वत्र उद्योग व्यवसाय बंद असताना वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीज बील आल्याने ग्राहकां मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजाचे काचा फोडून निषेध आंदोलन केले.
-------------------
(संपादन- पूजा विचारे)
Torrent power office vandalized by MNS activists in Bhiwandi
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.