अंबरनाथ : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. सध्या लागू केलेल्या लॉकडाऊनच्या मुदतीनंतर (19 जुलै) दुकाने उघडण्याची परवानगी देण्याच्या मागणीसाठी अंबरनाथ आणि बदलापूरचे व्यापारी एकवटले आहेत. त्यानंतरही दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सततच्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी अंबरनाथ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजीभाई धल यांच्या उपस्थितीमध्ये आज अंबरनाथला व्यापारी बांधवांची बैठक झाली. या बैठकीत 19 जुलैनंतर दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनामार्फत दिली गेली नाही तर व्यापारी दुकाने बंद ठेवून दुकानांच्या चाव्या नगरपालिकेत आणून देतील, असा इशारा
संघटनेचे उपाध्यक्ष युसूफभाई शेख यांनी दिला आहे. यावेळी प्रवीण शर्मा, आकाश राका तसेच बदलापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, ज्वेलर्स असोसिएशनचे समीर मिरकुटे, सचिव श्रीराम चुंबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Traders from Ambernath and Badlapur have rallied to demand permission to open shops.
-----------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.