Thane Transport Changes sakal
मुंबई

Thane Transport Changes : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथे सभा ; ठाणे जिल्ह्यात जड अवजड वाहनांसाठी वाहतुकीत बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कल्याण येथे ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कल्याण येथे ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी मुंबई नाशिक महामार्ग, भिवंडी, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, बदलापूर येथील मुख्य मार्गांवर मोठे वाहतुक बदल लागू केले आहेत. ठाणे जिल्ह्यात जड अवजड वाहनांसाठी बदल लागू करण्यात आले असून रात्री 12 वाजेपर्यंत हे बदल लागू असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आधारवाडी परिसरात जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांकडून चोख बंदोबस्त सुरू झाला आहे. ठाणे वाहतुक पोलिसांनी परिसरात वाहतुक बदल लागू केले आहे.

नाशिक येथून खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्गे उरण जेएनपीटी तसेच इतर ठिकाणी जाणार्या मार्गावरील जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका येथून माजिवडा, मुलुंड, ऐरोली मार्गे इच्छित स्थळी जातील. नाशिककडून रांजनोली येथून, कोनगाव एमआयडीसी, दुर्गाडी दिशेने कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

ही रांजनोली नाका, खारेगाव टोलनाका मार्गे इच्छीत स्थळी जातील. शिळ- कल्याण मार्गे पत्रीपूलाकडे वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने बदलापूर चौक येथून वळण घेवून लोढा पलावा मार्गे कल्याण फाटा,महापे, आनंदनगर चेकनाका मार्गे जातील. उल्हासनगर शहरातून वालधुनी पुलावरून कल्याण दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना उल्हासनगर शहरातील शांतीनगर जकात नाका येथे प्रवेश बंदी असेल.

येथील वाहने शांतीनगर जकात नाका येथून डावे वळण घेवून जातील. विठ्ठलवाडी येथून वालधुनी पुलावरून कल्याण दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकासमोर प्रवेश बंदी असेल. येथील वाहने श्रीराम चौक, उल्हासनगर येथून जातील. मुरबाड येथून शहाड पूल मार्गे कल्याण दिशेने वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना म्हारळ जकात नाका येथे प्रवेश बंदी असेल.

ही वाहने म्हारळ जकात नाका येथून डावे वळून घेवून उल्हासनगर मार्गे जातील. नाशिक महामार्गावरून बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण, नाव्हाशेवा येथे वाहतुक करणारी वाहने बापगाव वरून गांधारी मार्ग होत असते. येथील जड अवजड वाहने पडघा येथील तळवली चौकी येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने ठाणे दिशेने मार्गस्थ होऊन ऐरोली मार्गे वाहतुक करतील. गुजरात येथून घोडबंदर रोडच्या दिशेने ठाणे शहरात वाहतुक करणाऱ्या वाहनांना मनोर टेप नाका, चिंचोटी नाका, फाउंटन उपहारगृह, गायमुख जकात नाका येथे प्रवेश बंदी असेल. येथील मनोर टेप नाका येथून पोशेरी, पाली, वाडानाका, शिरीपपाडा, अबिटधर, कांबरे, पिवळी वेल्हे, दहगाव मार्गे वासिंद, शहापूर, किन्हवली मार्गे माळशेज घाट मार्गे वाहतुक करतील.

महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना शिळफाटा येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून ऐरोली मार्गे जातील. तळोजा, नवी मुंबई येथून दहिसर मोरी मार्गे कल्याण फाटा येथून कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना दहिसर मोरी येथे प्रवेश बंदी असेल.

येथील वाहने दहिसर मोरी पनवेल मार्गे इच्छित स्थळी जातील.नवी गुंबई, शिळफाटा, खोणी कडून नेवाळी नाका मार्गे कल्याण कडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने नेवाळी नाका येथून अंबरनाथ, बदलापूर मार्गे इच्छित स्थळी जातील. बदलापूर, अंबरनाथ कडून नेवाळी नाका मार्गे कल्याण कडे जाणार्या जड अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने खोणी फाटा, नावडे फाटा, नवी मुंबई मार्ग इच्छित स्थळी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT