traffic police crime of overspeeding on Samriddhi Highway despite 120 speed limit traffic rule mumbai esakal
मुंबई

Mumbai News : 120 वेग मर्यादेनंतरही समृद्धी महामार्गावर ओव्हरस्पिडींगच्या सर्वाधीक गुन्हे

11 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत 613 गुन्हे दाखल ;औरंगाबाद, जालना टप्यात सर्वाधिक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ताशी 120 किलोमीटर वेगाची मर्यादा निश्चित करणारा राज्यातील समृद्धी महामार्ग हा पहिला महामार्ग आहे. मात्र, त्यानंतरही वाहन चालक वेगावर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ राहत आहे.

11 डिसेंबर रोजी नागपुर - शिर्डी पहिल्या टप्यांच्या लोकार्पणानंतर सुरू झालेल्या वाहतुकीमध्ये सर्वाधीक गुन्हे ओव्हरस्पिडींगचे असल्याची माहिती पुढे आली आहे. 130 ते 180 पर्यंतच्या वेगाची नोंद महामार्ग पोलीसांच्या इंटरसेप्टर व्हेईकलच्या माध्यमातून कारवाई करतांना दिसून आली आहे.

राज्य सरकारने राज्याच्या दोन टोकांना एकत्र करून सरळ महामार्ग उभारण्याचे कारण ग्रामीण विकासाला चालणा देण्याचे आहे. त्यासाठी सहा पदरी या महामार्गावर वाहनांना ताशी 120 किलोमीटर वेगाची मर्यादा आखून दिली आहे.

या वेगाने जरी वाहन चालवल्यास सर्वसामान्य प्रवासाच्या वेळेच्या चार ते पाच तास नागपुरहून शिर्डी पोहचण्यासाठी वाचणार आहे. मात्र, त्यानंतरही वाहन चालकांडून वेगाशी स्पर्धा करत बेदरकारपणे वाहन चालवण्याची स्पर्धा समृद्धी महामार्गांवर दैनंदिन सुरू आहे.

परिणामी महामार्ग पोलीसांची आता अधिक जबाबदारी वाढली असून, गेल्या 23 दिवसांमध्ये सर्वाधीक ओव्हरस्पिडींगची कारवाई मोहिमच हाती घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधीक केसेस औरंगाबाद टप्पातील औरंगाबाद आणि जालना येथे करण्यात आल्या

असून, एकूणच नागपुर - शिर्डी या टप्यातील 50 टक्के केसेस एकट्या औरंगाबाद विभागाने केल्या आहे. महामार्ग पोलीसांना समृद्धी महामार्गावरील वाहन चालकांच्या वेगावर नियंत्रण ठेवून परिस्थिती आटोक्यात आणायची असल्यास शासनाकडे वाहन आणि मनुष्यबळासाठी धुळखात पडलेल्या प्रस्तावाला त्वरीत मंजुरी देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

गुन्ह्याचे प्रकार - एकूण केसेस - एकूण दंड

लेन कटिंग - 1 - 0

चालक तथा सहकारी विना हेल्मेट प्रवास - 30 - 13500

ओव्हरस्पिडींग - 613 - 1226000

विना सिटबेल्ट - 78 - 15300

इतर - 173 - 84000

एकूण - 895 - 1338800

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT