मुंबई

निवडणूक काळात वाहतूक नियमांची ऐशीतैशी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत नुकतेच मतदान पार पडले आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत १ ते २२ मे या कालावधीत साडेतीन लाख वाहतूक नियम उल्लंघनच्या घटना घडल्या आहेत. यातील वाहनचालकांकडून ई-चलनद्वारे दंड आकारण्यात आला असून ही रक्कम २५ कोटी ३१ लाख इतकी आहे. यात सर्वाधिक विनाहेल्मेटच्या दंडाची नोंद असल्याचे मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले; परंतु मुंबईत साडेतीन लाख वाहतूक नियम उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात मुंबईत २३९ अपघातांची नोंद झाली. यामध्ये २४ जणांचा बळी गेला आहे; तर २५५ जण जखमी झाले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केल्यामुळे मृत्यूच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
दुसरीकडे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी तीन लाख ५२ हजार ५३७ कारवाया केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही विनाहेल्मेटच्या होत्या. वाहतूक पोलिसांच्या छुप्या कॅमेऱ्यात त्यांचा हा प्रताप कैद झाला आहे. त्यानुसार ई चलान धाडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तर कधी त्यांचा सत्कार करत नियमांचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्यापाठोपाठ विना सीटबेल्ट, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, विनापरवाना वाहन चालवणे, ड्रिंक अँड ड्राइव्ह आणि इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
---------------
‘नो पार्किंग’चे उल्लंघन जास्त
मुंबईत मे महिन्यात अनेक वाहतूक नियम उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा इतर गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. तसेच दोन लाख ६८ हजार ५७८ घटना असून यातील नो पार्किंगमध्ये वाहने उभी करण्याच्या घटना जास्त आहेत.
-----

गुन्हे प्रकार -- एकूण चलान -- दंड
विनाहेल्मेट - ४८,६३५ - २,४२,९६,५००
विनासीटबेल्ट - २९,९७४ - ५९,९४,४००
ट्रिपल सीट - १,९९१ - १९,८७,०००
मोबाईलचा वापर - १,९७८ - ३३,५०,०००
विनापरवाना वाहन चालवणे - १,१०१ - ५३,९०,०००
ड्रिंक अँड ड्राइव्ह - २८० - ०
इतर गुन्हे - २,६८,५७८ - २१,२०,८२,५००
एकूण - ३,५२,५३७ - २५,३१,००,४००
---
प्रचार रॅलीच्या तक्रारी
निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या रॅली काढल्या होत्या. यामध्ये बाईक रॅली जास्त होत्या. याप्रकरणी अनेक मुंबईकरांनी एक्स अकाउंटद्वारे वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
----
कोट्यवधींचा दंड थकीत
मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली होती; पण अनेकजण पैसे भरत नाहीत. मुंबईत वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांनी कोट्यवधींचा दंड थकविला आहे.
---
उमेदवारांनाच नियमांचा विसर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या निघाल्या. यामध्ये दुचाकी रॅलीत उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन झाले. उमेदवारांनी कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन करणे तर सोडाच ते स्वतःही विनाहेल्मेट होते. तसेच काही जणांनी कार रॅलीत सीटबेल्ट घातला नव्हता.
----
निवडणूक रॅलीत कोणी विनाहेल्मेट किंवा इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर वाहतूक नियमांनुसार कारवाई करण्यात आली. ज्या तक्रारी आल्या त्यांच्यावर ई-चलान आकारण्यात आले आहे.
- अनिल कुंभारे, सहपोलिस आयुक्त, वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT