Mumbai Traffic Changes Esakal
मुंबई

Mumbai Traffic Updates: मुंबईतील अनेक रस्ते 23 सप्टेंबर रोजी बंद; जाणून घ्या पर्यायी मार्गांविषयी सर्वकाही

आशुतोष मसगौंडे

Roads In Mumbai To Be Closed On Sept 23 For Bombay HC Ceremony:

भारताचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाची पायाभरणी करणार आहेत. त्यामुळे आज (२३ सप्टेंबर) वांद्रे-कुर्ला संकुलासाठी (BKC) वाहतूक नियम जाहीर करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रमुख रस्ते बंद करत पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे. सामान्य प्रवासी आणि नोकरदारांना होणारा विलंब टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीस उपायुक्तांनी (वाहतूक) यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी परिसरातील शासकीय वसाहतीच्या मैदानावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच्या पायाभरणी समारंभासाठी सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर व्हीव्हीआयपी व्यक्ती येणार आहेत.

वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, रामकृष्ण परमहंस मार्ग आणि जेएल शिर्सेकर मार्ग यांना जोडणारा न्यू इंग्लिश स्कूल रोड बंद केला जाणार आहे. मात्र कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी सदर रस्ता वापरण्याची परवानगी आहे.

याला पर्याय म्हणून वाहनचालकांना महात्मा गांधी विद्या मंदिर रोडचा वापर करता येणार आहेत. दरम्यान रात्री 9 नंतर या मार्गांवरील नियमित वाहतूक सुरू होणार आहे, अशी माहितीही वाहतूक पोलिसांनी दिली आहे. .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh And Rupali Chakankar: चित्रा वाघ ते रुपाली चाकणकर... 'या' 12 जणांना मिळणार आमदारकी? महायुतीचा फॉर्म्युला ठरला

Chandrayaan 3 Moon Crater : चांद्रयान-3 ची कमाल! प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर शोधला 160 किमीचा रुंद खड्डा, जगभरातून होते वाहवाही

Latest Maharashtra News Updates live: भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक, पहिल्या यादीवर होणार चर्चा

Hair Fall: टाळूला खाज सुटणे अन् कोंडामुळे त्रस्त आहात? 'या' हिरव्या पानांचा करा उपाय

Share Market Opening: शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर; कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT