मुंबई : 18 वर्षाखालील मुलांनाही (children) आता लोकलने प्रवास (Train travelling) करता येणार आहे. राज्य सरकारच्या (mva Government) सुचनेनंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने (central railway) अठरा वर्षाखालील मुलांना रेल्वेने प्रवास (train permission) करण्याची मुभा दिली आहे. यासाठी त्यांना तिकीट खिडकीवर मासिक पास (monthly pass) घ्यावा लागणार आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवसापासून पासासाठी मुलांनी गर्दी केली होती.
15 ऑक्टोबर पासून मध्य आणि पश्चिम रेल्वेने राज्यसरकार ने सूचना केल्या नंतर 18 वर्षा खालील मुलांना लोकल ने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी त्यांना लोकल तिकीट खिडकीवर मासिक पास घ्यावा लागणार आहे. तसेच पास घेताना सोबत महाविद्यालय किंवा शाळेचे ओळखपत्र ठेवावे लागणार आहे. विशेष म्हणजे मासिक पास घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे पुन्हा तोच गोंधळ होणार आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्याला आठवड्यातून एकदा शाळेत अथवा महाविद्यालयात जायचे असल्यास मासिक पास का घ्यावा असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. यामुळे तिकीट देण्याची मागणी होत आहे. 20 ऑक्टोबर पासून अनेक महाविद्यालय देखील सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करायचा असल्यास सोबत वैद्यकिय किंवा रुग्णालयाची कागदपत्र असणे गरजेचे आहे.
वैद्यकीय कारणासाठी प्रवासास परवानगी
दोन्ही डोस पूर्ण झालेले नसतील मात्र त्यांना महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास त्यांनाही लोकल प्रवास करता येईल. मात्र त्यासाठी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र पुरावा म्हणून घ्यावा लागेल. हा पुरावा दाखवल्यानंतरच मासिक पास तिकीट खिडक्यांवर दिला जाईल.
प्रवास करताना ओळखपत्र अनिवार्य
शाळा महाविद्यालय सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाला अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन 18 वर्षाखालील मुलांना रेल्वे प्रवासास मासिक पास घेऊन परवानगी दिली आहे. मात्र प्रवास करताना ओळखपत्र आणि मासिक पास सोबत ठेवणे अनिवार्य असेल असे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शाळा, महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.