Akshay Shinde ESakal
मुंबई

Akshay Shinde: जंगलात टाका नाहीतर...; अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला तृतीयपंथीयांचा विरोध, दिला थेट इशारा

Vrushal Karmarkar

मुंबई. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले होते. यानंतक अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी काही जागा शोधण्यात आल्या. मात्र या जागांवर विरोध दर्शवण्यात आला. आता उल्हासनगरमधील एक जागा देण्यात आली होती. यासाठी खड्डाही खोदण्यात आला होता. मात्र या जागेवर अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी तृतीयपंथीयांनी विरोध दर्शवला आहे. तसेच एक इशाराही दिला आहे.

अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी उल्हासनगरमधील एका जागेत खड्डा खोदला होता. त्यानंतर काही ग्रामस्थांनी त्या जागेवर जाऊन तो खड्डा बुजवला आहे. तसेच तृतीयपंथीयांनी अक्षय शिंदेचा मृतदेह त्या जागी दफन करण्यासाठी विरोध केला आहे. या प्रकरणी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अक्षयचा मृतदेह जंगलात पुरा नाहीतर नदीत टाका, मात्र त्या नराधमाचा मृतदेह इथे पुरू नका, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला होता. तसेच पोलीसही घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच तो खड्डाही पुन्हा खोदण्यात आला आहे.

दरम्यान आज अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार आहे. यासाठी कळवा रुग्णालयातून अक्षयचा मृतदेह घेऊन पथक रवाना झालं आहे. उल्हासनगरमध्ये अक्षयचे दफनविधी होणार आहे. यासाठी त्याचे नातेवाईक जमले आहेत. तर दुसरीकडे अक्षय शिंदे हा हिंदू होता आणि त्याच्या कुटुंबात दफन करण्याची परंपरा नाही. असे असूनही त्याच्या आई-वडिलांना मृतदेहावर अंत्यसंस्कार का करायचे? मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अक्षयच्या वडिलांच्या वकिलाने हा खुलासा केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Live Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

IPL 2025 Auction Explainer: नवा सिजन, नवे नियम... खेळाडूंचं रिटेंशन, RTM कार्डचा वापर अन् १२० कोटींची किंमत; समजून घ्या सर्वकाही

Uddhav Thackeray: महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर... विरोधकांना थेट इशारा, नागपुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

SCROLL FOR NEXT