मुंबई : एसटी महामंडळात शिवाई इलेक्ट्रिक बसेसनंतर आता इंधनावर धावणाऱ्या शिवनेरी बसेस बदलवून ई - बसेस आणल्या जाणार आहे. बुधवारी पुण्यात ८ इलेक्ट्रिक बसेस आरटीओ मध्ये दाखल झाल्या असून, एप्रिल अखेर पर्यंत मुंबईत सुद्धा इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहे.
या बसेस शिवनेरीच्या ठिकाणी धावणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक करण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. जसजशा इलेक्ट्रिक बसेस मिळतील तशा शिवनेरी चया ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस सोडण्यात येणार असून, इंधनावरील धावणाऱ्या शिवनेरीच्या तुलनेत ई बस शिवनेरीचे भाडे स्वस्त असेल असे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले आहे.
एसटीच्या ताफ्यात स्वामालकीच्या आणि कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सुमारे २०० बसेस सध्या सेवेत आहे. या सर्व शिवशाही बसेस दुसऱ्या मार्गावर सोडून याठिकाणी इलेक्ट्रिक बसेस भविष्यात धावणार आहे. नव्याने येणाऱ्या सर्व १०० इलेक्ट्रिक बसेस मुंबई पुणे महामार्गावर सोडण्यात येणार आहे. या बसेस सुमारे ३५० किलोमिटर पर्यंत धावू शकणारे चार्जिंग क्षमता राहणार आहे. शिवाय, मुंबई पुणे महामार्गावर चार्जिंग स्टेशन सुद्धा बसवण्यात आले असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.
इलेक्ट्रिक बसेसची विशेषतः
इलेक्ट्रिक बस एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकणार आहे. प्रत्येक सीट जवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत. बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४3 प्रवासी बसू शकणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.