Azad Samaj Party sakal media
मुंबई

Mumbai Train: लोकल सेवा सुरू करण्यासाठी 'या' पक्षाचे नियमभंग आंदोलन

लोकलमध्ये प्रवास करून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सुरू करण्याची मागणी

कुलदीप घायवट

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास (Mumbai Train) करण्याची परवानगी द्यावी, यासाठी आझाद समाज पार्टीच्यावतीने लोकलमध्ये प्रवास करून नियमभंग आंदोलन(Rule Break Travel Strike) केले. खासगी नोकरदार वर्ग, कष्टकरी, कामगार, श्रमिकांना लोकल सुरू करण्याची मागणी (Local Start Demand) यावेळी केली. पक्षाच्यावतीने सीएसएमटी (CSMT) येथे सर्वसामान्यांना ​लोकल सुरू करण्यासाठी शुक्रवारी (ता.23) रोजी आंदोलन केले. ( Traveling Rule Break Strike By Azad Samaj Party At CSMT-nss91)

​मागील तीन महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दरवाजे बंद आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवासी लोकल सुरू होण्याची वाट बघत आहे. मात्र, सरकारकडून 70 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यावर लोकल सुरू करू असे बोलले जाते. मात्र, लसीकरणाचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना लस मिळत नाही. मग, 70 टक्के लसीकरणाची प्रत्येक प्रवाशांनी वाट पाहायची का ? मे महिन्यात 50 टक्के लसीकरणाबाबत बोलण्यात आले होते. आता 70 टक्के लसीकरण बोलले जात आहे. मग अजून पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आणि असे बरेच काही सांगितले जाईल. तोपर्यंत प्रवाशांनी लोकल सुरू होण्याच्या प्रतिक्षेतच राहायचे का ? आता नागरिकांना पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत बघणे थांबविले पाहिजे, असे पार्टीच्यावतीने सांगण्यात आले.

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आता, ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्या नोकऱ्या पण जाण्याची शक्यता आहे. कारण मागील, तीन महिन्यांपासून लोकल प्रवास बंद आहे. खासगी नोकरदार वर्गाला कार्यालयात जाण्यासाठी पर्यायी वाहनाने प्रवास करून लागतो. परिणामी, त्याचा जीव मेटाकुटीला आला आहे. लोकल बंदी असल्याने कष्टकरी वर्ग, कामगार वर्गाच्या हाताला काम नाही. त्यामुळे लोकल सुरू करणे आवश्यक आहे. पूर्वी कोरोनाची रुग्ण संख्या अधिक होती. त्यावेळी प्रवाशांनी लोकल प्रवास बंदी मान्य केली. मात्र, आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याने लोकल सुरू करणे आवश्यक आहे. नोकरी कामधंद्यावर जाण्यासाठी वेगवान, स्वस्त तिकिट दर असलेल्या लोकलवरच अवलंबून आहेत. तेव्हा त्यांना रोखणे त्याची चूल बंद पाडण्यासाठी हातभार लावला जात आहे. या विरोधात पक्षाच्यावतीने सरकारच्या, प्रशासनाच्या क्रूर धोरणाचा निषेध करण्यात आला. चाकरमानी, कष्टकरी वर्गासाठी लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करावी, असे आझाद समाज पार्टीचे मुंबईचे महासचिव अतुल खरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT