मुंबई

विकतचे दुखणे कशासाठी? कार भाड्याने घेण्याचा मुंबईतही ट्रेंड वाढतोय

कृष्ण जोशी

मुंबई  ः स्वतःच्या मालकीची मोटार असावी हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र तिच्या भल्याथोरल्या किमतीसाठी सेव्हिंग मोडा किंवा कर्जाचे हप्ते भरत बसा, नंतर विमा, कर, मेंटेनन्स याच्या रकमा भरा... हे व्याप करण्यापेक्षा कमी पैशांमध्ये हवे तेवढे महिने भाड्याने मोटार घेण्याकडे हल्ली उच्चभ्रू नोकरदारांचा कल वाढू लागला आहे. 

ठराविक रक्कम भरून मोटार भाड्याने घेतली की फक्त पेट्रोलचा खर्च आपला अशी योजना मारुती तसेच हुंदई या मोटार उत्पादक कंपन्यांनीच आणली आहे. गेली एक दोन वर्षे वाहन निर्मिती उद्योग मंदीत असल्याने त्यावर मात करण्यासाठी या उद्योगांनी ही शक्कल लढवली आहे. त्याला भारतातल्या प्रमुख शहरांमधील नोकरदारांचा उत्साही प्रतिसाद मिळतो आहे. 

मारुतीची सुझुकी स्वीफ्ट ही मोटार किमान साडेपाच लाखांना मिळते. तिच्या कर्जाचा किमान हप्ता साडेचौदा ते पंधरा हजारांपर्यंत असतो. त्याखेरीज इतर खर्च वेगळेच व तेदेखील साधारण एवढेच होतात. त्याऐवजी ही मोटार दरमहा साडेचौदा हजार रुपयांना भाड्याने मिळू शकते व यात विमा, मेंटेनन्स, लहानमोठ्या दुरुस्त्या यांचा समावेश असतो. 

अनेक उद्योजक करबचतीसाठी किंवा नवी मोटार वापरण्यासाठी मोटार विकत घेऊन दर दोन तीन वर्षांनी ती विकतात व पुन्हा नवी घेतात. नव्यानेच नोकरीला लागलेल्या तरुण नोकरदारांना मोटार खरेदीसाठी एकरकमी एवढे पैसे देणे शक्‍य नसते. काही नोकरदारांची दर दोन तीन वर्षांनी एका शहरातून दुसऱ्या शहरात बदली होते. अशांसाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असे बोलले जात आहे. 

हुंदई मोटर्सने याचवर्षी हैदराबाद व मुंबई या शहरांमधून ग्रॅंड आय टेन, निओज, सॅंट्रो या गाड्यांसाठी ही योजना सुरु केली व मार्च पासून त्यांच्या साडेचार हजार मोटारी भाड्याने गेल्या आहेत. मारुतीनेदेखील काही महिन्यांपूर्वीच दिल्ली, गुरगाव, बंगलोर व अन्य आठ शहरांसाठी ही योजना आणली. आता नऊ हजार मोटारी लोक वापरत आहेत, असे मारुतीचे वरिष्ठ अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले. 

 The trend of car rental is also increasing in Mumbai

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT