मुंबई

रिपब्लिक टीव्हीचे 4 अधिकारी आणि हंसा कंपनीच्या दोन जणांना गुन्हे शाखेकडून समन्स

राजू परुळेकर

मुंबईः टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासला सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या चार वरिष्ठ अधिकारी आणि हंसा कंपनीच्या दोघांना अशा सहा जणांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. 

टीआरपी घोटाळ्यात पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ सुब्रमण्यम यांच्यासह दोन जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्यांना समन्स पाठविण्यात आले होते. मात्र सुब्रमण्यम हे शनिवारी चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही. टीआरपी प्रकरणात आता आयकर विभाग जीएसटीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे मदत घेणार आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार आरोपीने अटक केली आहे. तर इतर गुन्हेगार फरार झालेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके बनविली आहेत. टीआरपी प्रकरणी अटक केलेल्या चार जणांमध्ये शिरीष सतीश पट्टणशेट्टी, नारायण नंदकिशोर शर्मा, विशाल वेड भंडारी आणि बोंमपल्ली  राव मिस्त्री यांचा समावेश आहे. या चारही जणांच्या चौकशीत खूप काही बाहेर पडले आहे. त्यामुळे रिपब्लिकन टीव्हीचे सीईओ सुब्रमण्यम यांच्या समोर अडचणी निर्माण झाल्यात. 

दुसरीकडे गुन्हे शाखेच्या रिपब्लिक टीव्हीचे सीईओ सुब्रमण्यम आणि हंसा कंपनीच्या दोघांना चौकशीसाठी समन्स पाठविले. मात्र शनिवारी जाहिरात कंपनीचे दोन्ही मालक चौकशीसाठी शनिवारी हजर राहिले. मात्र शिव सुंदरम हे चौकशीसाठी हजार राहिले नाही. त्यांच्या चॅनलच्यावतीने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे. त्यावर पुढच्या आठवडयात सुनावणी होणार आहे.  त्यामुळे आपण चौकीशीसाठी हजर राहू शकत नसल्याचा  निर्वाळा गुन्हे शाखेच्या त्यांनी दिला. चौकशीला हजार राहिलेल्या दोन्ही जाहिरात कंपनीच्या मालकांची आठ तास चौकशी केली. यात पोलिसांनी त्यांना दोन वर्षात जाहिरात कंपनीने कोणाला किती जाहिराती दिल्या आणि त्या जाहिरातींचे दर काय  होते. असे प्रश्न विचारण्यात आले. 

या अतिअर्पि घोटाळ्यात जाहिरात कंपनीचे दोन तर रिपब्लिकन टीव्हीचे चार जणांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके आहेत. मुंबईत आणि मुंबई बाहेर त्यांचा शोध घेण्यात येत आहे. तर गुन्ह्याच्या तापासाठी गुन्हे शाखा आर्थिक शाखा आणि जीएसटी यांची मदत घेण्यात येणार असायची माहिती उपलब्ध आहे. या चौकशीत आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

TRP case Crime Branch summons 4 Republic TV officials and 2 Hansa employees

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर!

Latest Maharashtra News Updates : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 12 नोव्हेंबरपासून होणार सुरु

Narendra Modi: नरेंद्र मोदींची सभा वळवणार का विदर्भवासियांची मनं?

आजचे राशिभविष्य - 9 नोव्हेंबर 2024

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT