मुंबई - मुंबईला पाणी पुरविणा-या सात तलावांपैकी तुळशी, विहार, तानसानंतर आज मोडकसागर हा चौथा तलावही भरून वाहू लागला आहे. त्यामुळे सातही तलावांत सध्या ६८.६ टक्के पाणीसाठा जमा झाला असून तो एप्रिल २०२४ पर्यंत पुरेल इतका जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या ऑगस्टमध्ये पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय पालिकेकडून होण्याची शक्यता आहे.
मान्सून लांबल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांनी तळ गाठला होता. पालिकेला १० टक्के पाणी कपात करावे लागले आहे. सध्या तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू आहे. त्यामुळे सात तलावांपैकी तुळशी, विहार, तानसानंतर आज मोडकसागर हा चौथा तलावही भरून वाहू लागला आहे.
त्यामुळे सातही तलावांत सध्या ६८.६ टक्के पाणीसाठा जमा झाला असून तो एप्रिल २०२४ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या ऑगस्टमध्ये पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय पालिकेकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
तुळशी, विहार, तानसानंतर आता मोडकसागर ही चार तलावे आठ दिवसांत भरून वाहू लागली आहेत. धऱण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने सातही तलावांत पाणीसाठा वाढत आहे. मोडक सागर रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सातही तलावांमध्ये ९८,५१३ कोटी लीटर (९,८५,१३० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ६८.०६ टक्के एवढा पाणीसाठा आहे. सात धरणांपैकी चार तलाव हे गेल्या आठ दिवसांत ओव्हर फ्लो झाल्याने २५५ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे.
हा पाणीसाठा एप्रिलपर्यंत पुरेल इतका असल्याने मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे. धरणांतील पाणी साठ्याची उपलब्धता लक्षात घेऊन १ जुलैपासून मुंबईत लागू असलेली १० टक्के पाणी कपात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रद्द करण्याचा निर्णय घेतला घेतला जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.
सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. २८ जुलै २०२३ रोजी सातही धरणात ९ लाख ८५ हजार १३० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
सात धरणांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा - ९७,१४१
मोडक सागर - १,२८,९२५
तानसा - १,४४,४७५
मध्य वैतरणा - १,५४,२४९
भातसा - ४,२४,५९६
विहार - २७,६९८
तुळशी - ८,०४६
तीन वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
२०२३ - ९,८५,१३०
२०२२ - १२,७६,११६
२०२१ - १०,१३,८७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.