विरार ः दिवाळी गेली की मग येतो तुळशी विवाहाची तयारी सुरु होते. रीतसर आमंत्रण पत्रिका तयार केल्या जातात. मात्र कोरोनामुळे हे सगळे यावर्षी मात्र नाही. यावर्षी घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच तुळशीचा विवाह साजरा करण्यात येणार आहे. तशा आमंत्रण पत्रिका ही समाज माध्यमावर फिरू लागल्या आहेत .
कार्तिकी एकादशी पासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. तुळशी विवाहानंतर विवाह सोहळे सुरू होतात. आजपासून चारदिवस चालणाऱ्या विवाहासाठी आवळे, चिंचा, ऊस यांची जमवाजमी करण्यासाठी बच्चे कंपनी मोठ्या आनंदात बाहेर जाते तर आता या वस्तू बाजारातही मिळू लागल्या आहेत. या विवाहासाठीची आमंत्रण पत्रिका समाज माध्यमावर चांगलीच गाजत आहे. या पत्रिकेत श्री. सौ. कुंडीत वाढ यांची कन्या तुळशी व श्री. सौ. शाळीग्राम पुत्र विष्णू यांचा शुभ विवाह सायंकाळी 8 वाजल्या पासून शुभमूर्तावर करण्याचे योजिले आहे. असा उल्लेख असून खाली आपले स्नेहांकित म्हणून , श्री.सौ. लाल झेंडू, श्री.सौ. पिवळा झेंडू , श्री.सौ. गुलाब काका ,श्री. सौ. मोगरा काका, आणि श्री. सौ. ऊस मामा यांची नावे टाकण्यात आली आहेत. तर किलबिल पाखरे म्हणून दुर्वा आणि गवत यांची नावे टाकण्यात आली आहेत.
विवाहाचे ठिकाण घरच्या तुळशीच्या कुंडी जवळ असून, जेवणाची वेळ ही आपापल्या घरी आपापल्या सोयी नुसार करावे असे टाकण्यात आले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंगसीचे पालन करून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे
------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.