मुंबई, कल्याण : वारंवार सांगितलं जातं की रेल्वे स्टेशनवर मस्ती करू नका, ट्रेनमध्ये मस्ती करू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका. पण ऐकतील ती लोकं कसली? कुणीही या गोष्टी अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. रोज आपल्याला समजतं ट्रेनमधून पडून अपघात झाला, कुणाचा हात रुळांशेजारच्या खांबाला लागून फ्रॅक्चर झाला. एक ना अनेक प्रकार..
अशीच एक दुर्दैवी घटना कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या सांगळेवाडी परिसरात घडलीये. रेल्वे रुळ ओलांडताना लोकलची धडक लागल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. अंतूदेवी दुबे असे या तरुणीचे नाव आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान सदर तरुणी हेडफोन्स कानाला लावून रूळ ओलांडत होती, ज्यामुळे तिला ट्रेनचा आवाज आला नाही आणि अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय अशी देखील माहिती सामोर येतेय.
मयत तरुणी याच परिसरातील लोक उद्यान गृहसंकुलातील राहत होती. कल्याण पूर्वेतील साकेत महाविद्यालयात जाण्यासाठी पश्चिमेकडील सांगळेवाडी परिसरातून ती कल्याण रेल्वे स्थानकाकडे जात होती. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या लोकलनी तिला धडक दिली. या अपघाताला रेल्वेचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
येथील वहिवाटीचा पर्यायी रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. परंतु रुळांलगत असलेल्या संरक्षण भिंतीचे काम अर्धवट स्थितीत असल्याने रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सांगळेवाडी परिसरातून रुळांवरुन नागरिक प्रवास करतात. आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी असाच एक अपघात झाल्याची माहिती पुढे येत आहे.
WebTitle : twenty three years old girl lost her life due to headphones
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.