Accident News  esakal
मुंबई

Accident News: मुंबईत दोन बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू

बेस्टच्या दोन बस आणि एका ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोन जणांना मृत्यू

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईमध्ये आज पहाटे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. बेस्टच्या दोन बस आणि एका ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण धडकेमध्ये दोन जणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या गोरेगाव चेक नाका पुलावर ही घटना घडली आहे. जॉनी संखाराम (वय 42 वर्षे) आणि सुजाता पंचकी (वय 38 वर्षे) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.(Latest Marathi News)

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास, बस क्रमांक 1862 च्या चालकाने ब्रेक लावला आणि बस क्रमांक 1453 च्या चालकालाही ब्रेक लावण्यास सांगितला. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे झाले असल्याने, बस क्रमांक 1453 घसरली आणि आधी बस क्रमांक 1862 आणि नंतर ऑटोरिक्षाला (एमएच 02 ईक्यू 9371) धडकली त्यामुळे भीषण अपघात झाला.(Latest Marathi News)

या अपघातात ऑटोरिक्षात असलेले जॉनी संखाराम आणि सुजाता पंचकी हे प्रवासी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र जॉनी संखाराम यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पहाटे पावणे तीन वाजता मृत घोषित केलं.(Latest Marathi News)

सुजाता पंचकी यांना अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे पहाटे पावणे चार वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.तर या अपघातात रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

IND vs NZ Pune Test: बुमरँग! भारत आपल्याच फिरकीच्या जाळ्यात All Out झाला ; मिचेल सँटनरच्या ७ विकेट्सने सारेच गांगरले

Latest Maharashtra News Updates Live : मनसेचे उमेदवार किशोर शिंदे मेट्रोने जाऊन भरणार अर्ज

Gold Silver Rate: सोन्याला ‘सोन्याचे दिन’, तर भाववाढीने चांदीचीही ‘चांदी’! 2 वर्षांत सोने 20, तर चांदीच्या भावात 30 हजारांची वाढ

IND vs AUS: वॉर्नरला भारताविरुद्ध खेळायचंय, पण कमिन्सनं करेक्ट शब्दात केला कार्यक्रम; म्हणाला...

SCROLL FOR NEXT