file photo 
मुंबई

जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत धोका आणखी वाढला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धारावीतील डॉ. बालिगा नगर भागात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळल्यामुळे बाधितांची संख्या सात झाली आहे. आसपासच्या परिसरातही तीन रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, महापालिकेने बालिगा नगर परिसर सील करून संशयित रुग्णांची तपासणी सुरू केली आहे.

धारावीतील डॉ. बालिगा नगरमध्ये 80 वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या 49 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या वृद्धाची 30 वर्षीय मुलगी तेथेच राहते. तिच्याकडून या दोघांना संसर्ग झाल्याचे समोर आले. यापूर्वी वैभव अपार्टमेंटमध्ये दोन, मदिना नगरमध्ये एक आणि मुकुंद नगरमध्ये एक असे चार रुग्ण सापडले आहेत. आणखी तीन रुग्ण सोडल्यामुळे बाधितांची संख्या सात झाली आहे. हे तिन्ही परिसर सील करण्यात आले असून, रहिवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.


डॉ. बालिगा नगरची लोकसंख्या अडीच हजारांहून अधिक आहे. एकूण 132 ज्येष्ठ नागरिकांपैकी 32 जणांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळली आहेत. त्यांच्या घशातील स्रावाचे स्वॅब तपासणीसाठी परळ येथील हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहेत. महापालिकेने हा परिसर सील केला असून, रहिवाशांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरू केला आहे. धारावी आणि लगतच्या परिसरात एकूण 10 कोरोना रुग्ण सापडले आहेत. 


3450 जणांचे होम क्वारंटाईन 
महापालिकेच्या पाहणीत 57 जण "हाय रिस्क' आणि 187 जण "लो रिस्क' व्यक्तींच्या संपर्कात आल्याचे आढळले. महापालिकेने या परिसरात पाच "कंटेन्मेंट झोन' घोषित केले आहेत. डॉ. बालिगा नगर, वैभव अपार्टमेंट, दिनकर अपार्टमेंट, शक्ती चाळ आणि मदिना नगर या परिसरांत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. या भागांतील 3450 रहिवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT