Sakal
मुंबई

Uddhav Thacekray: "त्यांना मांडी आहे हे आता कळलं"; मुश्रीफांवरुन ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

कलंकवरुन एवढं लागण्यासारखं काय? दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा कलंक लावता त्याचं काय? असंही ते म्हणाले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या सरकारमधील समावेशावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. "त्यांना मांडी आहे हे आता कळलं", अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. (Uddhav Thacekray attacks BJP on inclusion of Hassan Mushrif in Maha govt)

ठाकरे म्हणाले, "मी नागपुरात फडणवीसांसाठी कलंक हा शब्द वापरला त्याच्यात इतकं लागण्यासारखं काय आहे? ज्यांना लागलं त्यांनी दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले तो कलंक नाही का? हसन मुश्रीफ यांच्या पत्नीनं रस्त्यावर येऊन आक्रोश केला होता. आता हसन मुश्रीफ यांना त्यांनी सोबत घेतलं. आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. आधी आम्हाला बोलायचे बाळासाहेब यांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. आता बर झालं यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले त्यांना मांडीवर घेतलं. त्यांना मांडी आहे हे आता कळलं" (Latest Marathi News)

माझ्या तब्येतीवर भाजपवाले बोलतात. माझ्या ऑपरेशनची त्यांनी खिल्ली उडवली. मानेचा पट्टा गेला वैगरे. जेव्हा अशा परिस्थितीतून तुम्ही जाल तेव्हा शस्त्रक्रिया काय असते हे कळेल, अशा शब्दांत ठाकरेंनी टीकाकारांचा समाचार घेतला. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या कलंक या टीकेवरुन भाजपच्या नेत्यांमध्ये संताप असून त्यांनी ट्वीट करत आणि मीडियासमोर येऊन उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी टीका करताना ''उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे" अशी टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT