मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात अर्थात ठाण्यात आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय हिंदी भाषिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री शिंदेंसह पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं. 2024 जर आपण एकत्र आलो नाहीत तर आपली ट्रेन सुटली म्हणून समजा, अशा शब्दांत त्यांनी हिंदी भाषिक मुंबईकरांना शिवसेनेसोबत येण्याचं आवाहन केलं. (Uddhav Thackeray appeal to North Indians to unite for fight against BJP in 2024 LokSabha Election)
ठाकरे म्हणाले, "लोक मला विचारतात की तुम्ही सर्वांना एकत्र का करता आहात तुम्ही मोदींच्या विरोधात आहात का? पण मी मोदींच्या विरोधात नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात आहे. माझ्या भारत मातेच्या हातापायात यांचे साखळदंड मी बघू शकत नाही. मी माझ्या भारतमातेला कोणाचा गुलाम होऊ देणार नाही. हीच शपथ घेऊन आपल्याला आज जायचं आहे" (Latest Marathi News)
यापूर्वी मुघल या देशात आले म्हणजे बाहेरचे लोक आले. बाबरही आला म्हणून तर बाबरी मशीद पाडली. त्यानंतर इंग्रज आले दीडशे वर्ष राहिले यात अनेक पिढ्या गेल्या. त्यानंतर अखेर तो दिवस आला इंग्रजांना देखील जावं लागलं. आता इंग्रज तर गेले पण आता आपल्याच घरातले लोक आपल्या डोक्यावर बसता कामा नयेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. (Marathi Tajya Batmya)
कारण कोणीही असोत गुलामी ही गुलामीच असते. त्यामुळं मी पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो की, माझ्या भारतमातेला मी पुन्हा गुलाम होऊ देऊ इच्छित नाही. तुम्ही गुलाम होऊन विकासाचं स्वप्न पाहू शकता? तुम्हाला उठं म्हटलं की उठावं लागेल, बस म्हटलं की बसावं लागेल.
हा विकास तुम्हाला मंजूर आहे का? आज आपला देश एका अशा वळणावर आला आहे जिथं २०२४ मध्ये नाही झालं तर आपली ट्रेन सुटली. त्यानंतर आपला देश आपल्या हातून गेला. या नालायक, हुकुमशाहांच्या हातात देश जाईल. त्यामुळं मला पुर्ण विश्वास आहे की, जर आपण आता एकत्र आलो आहोत तर एकत्र राहुयात" असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांना केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.