मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी विधान भवनात जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट झाली. यावेळी त्यांच्यात काहीशी चर्चाही झाली, त्यावरुन राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. (Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet Thackeray gives explanation about it)
ठाकरे म्हणाले, "लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो यावरुन अनेकांना असं वाटत असेल ते गाण आहे ना? 'ना ना करते प्यार...' म्हणजे त्याचा पटोलेंशी काही संबंध नाही. 'ना ना करतो प्यार तुम्ही से कर बैठे' असं काही नाहीए. ही योगा योगानं झालेली अनौपचारिक भेट होती. भिंतीला कान असतात पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळं आमच्या गुप्त बैठका आता आम्ही लिफ्टमध्येच करु, असा उपरोधिक टोलाही यावेळी ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, आजच सकाळी चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांची भेट आणि चर्चा यामुळं भाजप आणि ठाकरे यांच्यात जवळीक वाढली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या भेटीवर भाजपचे अतुल भातखळकर म्हणाले होते, "उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. ही भेट योगायोगानं झाली आहे"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.