मुंबई

Shivsena: ठाकरे गटाचे शिंदे गटास सहकार्य, माजी आमदाराने दाखवला मनाचा मोठेपणा, नेमकं काय घडलं?

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Latest Kalyan News: डोंबिवलीत बॅनर, कमानींवरून भाजप शिवसेना शिंदे गटात राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे व ठाकरे गटात मात्र सलोख्याचे वातावरण दिसून येत आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी दत्त चौकातील आपली कमान उतरवत तेथे शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना कमानीसाठी जागा मोकळी करून दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील हे दोन्ही संभाव्य उमेदवार असताना ही दिलजमाई नक्की कशाची नांदी आहे याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सण उत्सवाच्या निमित्ताने त्यासोबतच डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवली तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली.

डोंबिवलीचे आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या दिवशी डोंबिवली काही खळबळजनक बॅनर लावले गेले आणि त्यावरून शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर येऊन वातावरण ढवळून निघाले. भाजप शिंदे गट या मित्र पक्षात गढूळ वातावरण तयार झाले असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गटात मात्र कल्याण ग्रामीण भागात दिलजमाई होत असल्याचे दिसत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या प्रभागात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने येथील दत्त चौकात कमान लावण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी दत्त चौकात कमान लावण्याविषयी केडीएमसीची अधिकृत परवानगी घेत येथे कमान उभारली होती. मात्र हा परिसर मोरे यांचा असून शिंदे गटाकडून भोईर यांना विनंती केली गेल्याने भोईर यांनी दत्त चौकातील आपली कमान हटवून तेथे शिंदे गटास कमान लावण्यास परवानगी दिली आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर हे प्रबळ दावेदार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी लढण्यास राजेश मोरे हे इच्छुक आहेत. निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही संभाव्य उमेदवारांमध्ये दिलजमाई होत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. उत्सवाच्या काळात कोणतेही वाद नकोत म्हणून ठाकरे गटाकडून ही कमान उतरवल्याचे बोलले जात आहे. मात्र ही नक्की कशाची नांदी आहे याची वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांना कडवे आव्हान येथील उमेदवारास द्यावे लागणार आहेत. मतांची गणिते आखताना डावपेच खेळले जात असून हे राजकारण कसे वळण घेते हे पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde: बुजवलेला खड्डा पुन्हा खोदला; पोलिसांचा मोठा फौजफाटा, अखेर अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण

Rohit Sharma: मुंबईच्या 'लोकल'ने मला टफ केलं...; रोहितनं सांगितलं कशी झाली क्रिकेटची सुरुवात अन् का घेतली T20I निवृत्ती

Navratri 2024 : एक-दोन नव्हे तर पुण्यात आहेत देवीची इतकी मंदिरे, तुम्हाला माहितीयेत का?

MLA Nitin Deshmukh's Son : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला; सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण

Latest Maharashtra News Live Updates: अखेर अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार पूर्ण

SCROLL FOR NEXT