लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आज मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या एका विधानाचा संदर्भ देत भाजपवर निशाना साधला.
ठाकरे म्हणाले, "उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील आणि मला वाटत आहे की, आता आरएसएसलाही धोका आहे...भाजप आरएसएसवर बंदी घालेल. (Uddhav Thackeray)
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतेच इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये नड्डा यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधावर भाष्य केले आहेत.
जेपी नड्डा यांनी मुलाखतीत सांगितले की, "वाजपेयींच्या काळात पक्षाला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती कारण त्यावेळी पक्ष लहान आणि कमी सक्षम होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता पक्ष मोठा झाला असून, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहे."
दरम्यान उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत जेपी नड्डा यांच्या याच विधानाचा संदर्भ देते म्हटले की, "उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील आणि मला वाटत आहे की, आता आरएसएसलाही धोका आहे...भाजप आरएसएसवर बंदी घालेल."
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, खर्गे साहेब आजच इंडियन एक्सप्रेसमध्ये बातमी आली आहे की, जेपी नड्डा म्हणाले, भाजपला संघाची गरज नाही. पुढील वर्षी आरएसएसला 100 वर्षे होत आहेत. जसे 16 वे वरीस धोक्याचे म्हणतात, तसेच आरएसएससाठी 100 वे वर्ष ध्योक्याचे आहे म्हणता येईल.
दरम्यान महाराष्ट्रातील प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला नकली शिवसेना म्हणून डिवचत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेही पंतप्रधान मोदींना आणि भाजपला सडेतोड उत्तर देत आहेत.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई परिसरातील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुंबईतील जागा उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने भाजपनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसेचे राज ठाकरे यांना सोबत घेत, या जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.