मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची दखल घेतलीय. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलंय. पूजा चव्हाण प्रकरणात सर्वांची चौकशी होईल. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोमोर दिली आहे. या प्रकरणात चौकशीअंती सत्य समोर येईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांनी चौकशीअंती कारवाई करु असं म्हटल्यानं आता तातडीनं संबंधित मंत्र्यावर कारवाई होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.
महत्त्वाची बातमी : शहाळ्याच्या ट्रकची झडती घेताच पोलिसच झाले अवाक; समोर होतं एक टन 800 किलो गांजाचं घबाड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणालेत ?
उद्धव ठाकरे म्हणालेत की, "त्यांच्याबद्दल व्यवस्थित चौकशी केली जाईल. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्याच्यात ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल त्यांच्यावर कारवाई होईल", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
दरम्यान मंत्री नॉट रिचेबल आहेत, ते समोर येऊन का खुलासा करत नाही असं देखील मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं. यावर उद्धव ठाकरे म्हणालेत की, "याबाबत कारवाई केली जाईल. गेले काही दिवस, काही महिने काही वेळेस असं आपल्याला लक्षात आलेलं आहे की, आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे असाही प्रयत्न होता काम नये. त्यासचसोबत सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते चैकशीनंतर लोकांसमोर येईल."
महत्त्वाची बातमी : धूम! धूम! धूम! मुंबईच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक बाईकचा धुमाकूळ, या बाईक्समुळे मुंबईत काय होतंय वाचा
काय आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ?
पूजाच्या मृत्यूच्या घटनेनंतर तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे. पूजाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. तिचा चुलत भाऊ आणि त्याच्या मित्राचा आम्ही जबाब नोंदवून घेतला गेला आहे. त्या रात्री पूजाने मद्यप्राशन केले होते, असंही त्यांच्या जबाबामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
maharashtra cm uddhav thackeray on puja chawan death case says in depth investigation will be done
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.