मुंबई : शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. खासदार राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी दोषमुक्तीचा केलेला अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. माझगाव महानगर दंडाधिकारी कोर्टानं हा अर्ज फेटाळला. त्यामुळं दोघांच्या अडचीत वाढ झाली आहे. (Uddhav Thackeray there is no relief for Uddhav Thackeray Sanjay Raut court rejected acquittal application)
राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी सांगितलं की, "माझ्या आशिलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं त्यांच्या याचिकेतून मान्य करण्यात आलं आहे. पण ते कृत्य आम्ही केलेलं नाही तर आमच्या वृत्तपत्राचे जे सहसंपादक अतुल जोशी आहेत ते या बातमीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना विरोधातील अब्रुनुकसानीच्या खटल्यातून दोषमुक्तक करण्यात यावं, अशी मागणी यातून केल्याचं त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)
सुप्रीम कोर्टाच्या एका प्रकरणावरील निकालानुसार, १९९२ मधील एका खटल्याचा निकाल रद्द करुन २०१३ मध्ये त्यावर पुन्हा निकाल दिला. यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की, कोणत्याही वृत्तपत्राचं मालक-संपादक प्रत्येक छापून येणाऱ्या गोष्टीसाठी जाबबदार असतील.
तीच बाब उद्धव ठाकरेंबाबत लागू होते. त्यानुसार, उद्धव ठाकरे मालक आणि मुख्य संपादकही आहेत, असंही शेवाळेंच्या वकिलांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)
त्यांनी अतुल जोशींना जरी पुढं केलं तरी तो चुकीचा न्याय ठरेल. मग आमच्या आशिलानं जायचं कुठं? कारण यामध्ये आमच्या आशिलाचं म्हणजेच राहुल शेवाळे यांच्या प्रतिमेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, असा युक्तीवाद आम्ही कोर्टात केला तो मान्य करुन कोर्टानं दोघांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.