मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड होणार आहे. त्या आधी अर्ज भरताना त्यांनी आपल्या नावावर किती संपत्ती आहे हे प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. यामध्ये मुखत्त्वे उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचा मोठा भाग हा त्यांनी गुंतवणूक केलेल्या शेअर्समधील असल्याचं समोर आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले पैसे कोणत्या प्रसिद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले आहेत हे नमूद केलंय. त्यांनी आपले तब्बल ९० टक्के शेअर्स हे मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांमध्ये गुंतवले आहेत. शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हे नेहमीच फायद्याचं ठरेल असं नाही. मात्र जर मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच फायदेशीर ठरते असा अंदाज बांधला जातो. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी काही मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
उद्धव ठाकरेंनी अर्जात भरलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नॉलॉजी, बिर्ला कॉर्पोरेशन, कोटक महिंद्रा आणि मारुती सुझुकी इंडिया या ५ बड्या कंपन्यांमध्ये आपले शेअर्स गुंतवले आहेत. यापैकी उद्धव ठाकरे यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये सर्वाधिक म्हणजेच तब्बल ६६.०१ टक्के शेअर्स गुंतवले आहेत.
कुठे आहेत किती शेअर्स:
मुंबईकरांच्या मदतीला धावले वर्ध्यातील ४५ डॉक्टरांचे पथक ..
आदित्य ठाकरेंनंतर आता ठाकरे घराण्यात उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली सर्व संपत्ती जनतेसमोर आली आहे.
Udhhav Thackeray invested his shares in these 5 big companies read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.