मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्यात संघर्ष सुरू आहे. यातच युजीसी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आणखी वाद वाढला आहे.
पटवर्धन यांनी परीक्षेची दारुसोबत तुलना केल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देऊन विद्यार्थांची माफी मागावी, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पटवर्धन यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. परीक्षेदरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला तर यूजीसी जबाबदार आहे का? असे प्रश्न विचारणे योग्य नाही.
आपण दारूची दुकान चालू करतो त्यावेळी हे प्रश्न विचारले का? असे डॉ. पटवर्धन म्हणाले होते. या विधानावरून विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी युजीसी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या परीक्षांची तुलना दारूच्या दुकाना सोबत केल्याच्या विधानाबद्दल ट्विटरच्या माध्यमातून तीव्र निषेध नोंदविला आहे. पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा: बाप रे ! दुबईहून आलेले प्रवासी दहा तास मुंबई विमानतळावरच; सोशल डिस्टंसिंगकडेही दुर्लक्ष..
नॅशनल फोरम फोर क्वलिटी एज्युकेशनचे सहसचिव कुशल मुडे यांनीही पटवर्धन यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. परिक्षेबाबत उपाध्यक्षांनी अत्यंत अशोभनीय अशी तुलना करून दारूच्या दुकानाच्या निर्णयाचा दाखला दिला हे निंदनीय आहे.
एकीकडे विद्यापीठ अनुदान आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 अंतर्गत पदवीच्या सगळ्याच सत्रांना सारखे महत्त्व असताना, विद्यापीठ अनुदान आयोगाची ही दुटप्पी भूमिका असून त्यांच्याच धोरणाशी विसंगत असल्याचे ते म्हणाले.
संपादन : अथर्व महांकाळ
UGC vice president compares exams with wine
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.