ulhasnagar area accident due to iron cage police action should taken by municipal office sakal
मुंबई

Mumbai Accident : दुकानासमोर असलेल्या लोखंडी जाळीमुळे होत आहेत दुर्घटना; कारवाईची उल्हासनगर महानगरपालिकाकडे नागरिकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - परिसरात मोबाईल मार्केट असल्याने वाहन चालक दुकानासमोर फुटपाथवर अनधिकृत रित्या वाहने उभी करतात. फुटपाथवर अनधिकृतरित्या गाडी उभी केल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

दुकानदारांनी दुकानासमोर लावलेल्या जाळीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच प्रकार उल्हासनगर मधील १७-सेक्शन परिसरात झाला आहे. अनधिकृत रित्या गाडी उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.

त्या अंतर्गत दि १५ जुलै २०२३ रोजी उल्हासनगर मधील १७-सेक्शन परिसरात अनधिकृतरित्या उभी केलेली गाडी उचलत असताना गाडीच्या मालकाला त्याची गाडी उचलत असल्याचे निदर्शनांस आले असता त्याने गाडीच्या दिशेने धाव घेतली.

दरम्यान दुकानदाराने लावलेल्या जाळीला धडकून त्याचा तोल गेला व त्याचे तोंड तिथून येत असलेल्या रिक्षावर जाऊन आदळले. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली सदर घटना वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी नागरिकांच्या सहाय्याने जखमी व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घडलेला संपूर्ण प्रकार सी. सी. टीव्ही मध्ये कैद झाला असून अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी फुटपाथवर अनधिकृतपणे जाळी लावणाऱ्या दुकानदारांवर उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT