शिवसेनेनं आम्हाला डिवचल्यास आम्हीही तशाच पद्धतीनं यापुढंही प्रत्युत्तर देऊ, असंही कपिल अडसूळ यांनी ठणकावलंय.
उल्हासनगर शहरात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपामध्ये (BJP) सुरू असलेल्या 'बॅनरवॉर'मधून भाजपनं काल रात्री '५० कुठे आणि १०५ कुठे?' असा शिवसेनेला डिवचणारा बॅनर लावला होता. हा बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास गायब झाला आहे. हा बॅनर चोरीला गेल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
तसंच 'प्रत्युत्तर द्यायचं असेल, तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे!' असा टोलाही भाजपनं शिवसेनेला लगावलाय. कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यातूनच उल्हासनगर शहरात या दोन्ही पक्षांमध्ये बॅनरवर सुरू झाला होता.
शिवसेनेनं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानंतर भाजपनंही '५० कुठे आणि १०५ कुठे? हा आमच्या भाजपचा मोठेपणा.. देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!' असा मजकूर असलेला बॅनर उल्हासनगरच्या १७ सेक्शनच्या चौकात लावला होता. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल अडसूळ यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास हा बॅनर लावला होता.
तसंच रात्री १ वाजता येऊन ते बॅनर लावलेला असल्याची खातरजमा करून गेले होते. मात्र, आज सकाळी हा बॅनर गायब झाला आहे. मध्यरात्री उल्हासनगर महापालिका बंद असते. त्यामुळं मध्यरात्री हा बॅनर कोणीतरी चोरून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसंच 'उत्तर द्यायचं असेल, तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे!' असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. हा बॅनर म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना असून शिवसेनेनं आम्हाला डिवचल्यास आम्हीही तशाच पद्धतीनं यापुढंही प्रत्युत्तर देऊ, असंही कपिल अडसूळ यांनी ठणकावलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.