Ulhasnagar News Sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीकडून 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक

महानगरपालिकेला 3 लाख 90 हजाराचा धनादेश, रुग्णांना मिळणार पोषक आहाराचे किट

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर -शहरातील क्षयरोग रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी किंबहूना त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता निक्षय मित्राची भूमिका निभावणाऱ्या उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीने तब्बल 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक घेतले आहेत.

या सर्व रुग्णांना पोषक आहाराचा पुरवठा व्हावा या सकारात्मक उद्देशाने कंपनीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे उल्हासनगर मेडिकल असोसिएशन यांच्या नावाने 3 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.

सेंच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी हा धनादेश आयुक्त अजीज शेख यांना सोपवला असून यावेळी उपायुक्त डॉ.सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मोहिनी धर्मा,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,क्षयरोग अधिकारी सत्यम गुप्ता,हानगरपालिका आरोग्य विभागाच्या पब्लिक प्रायव्हेट समनव्यक संगीता मगर,क्षयरोग विभागाच्या ममता कामरानी आदी उपस्थित होते.

महानगरपालिका कडून दरवर्षी क्षयरोग रुग्णांची शोधमोहिम राबिवली जाते.वर्षाला सरासरी दिड हजार क्षयरुग्ण आढळतात.त्यापैकी 86 टक्के रुग्ण औषधोपचार केल्यावर बरे होतात.तसेच क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते व रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाळता येते.

राष्ट्रपतींनी दिनांक 09 सप्टेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियानाची सुरुवात केलेली आहे.त्यात निक्षयमित्राच्या माध्यमातून क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती,प्रति महिना आवश्यक धान्य,कडधान्य,डाळी,तेल इत्यादी पोषक आहार देण्याचे प्रयोजन आहे.सहा महिन्याच्या पोषक आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाटयाने सुधारणा होत आहे.

सेंच्युरी रेयॉन कंपनीने निक्षय मित्र बनून आणि 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक घेऊन स्तुत्य काम केले आहे.या सर्व रुग्णांना 6 महिन्याचे पोषक आहाराचे किट देण्यात येणार आहे.

अशाचप्रकारे शहरातील क्षयरुग्णांना पोषक आहाराचा फायदा होण्याकरिता जास्तीत जास्त निक्षय मित्रांनी तयार व्हावे व अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घ्यावा असे आहावन आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव यांनी उल्हासनगरकरांना केले आहे.विशेष म्हणजे मागच्या वर्षी अजीज शेख यांनी सुद्धा निक्षय मित्र बनून 10 क्षयरुग्ण दत्तक घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

SCROLL FOR NEXT