Ulhasnagar firing incident Crime branch SIT 
मुंबई

Ganpat Gaikwad Firing: गोळीबार प्रकरणात SIT स्थापन; गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्षांना दिली, आमदारकी जाणार?

Ulhasnagar firing incident Crime branch SIT: भाजप आमदार गोळीबार प्रकरणात क्राईम ब्रँच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. ACP निलेश सोनावणे यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- भाजप आमदार गोळीबार प्रकरणात क्राईम ब्रँच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. ACP निलेश सोनावणे यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून खुलेआम गोळीबार करण्यात आला होता. त्यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.(Ulhasnagar firing incident Crime branch SIT led by ACP Nilesh Sonawane formed for the investigation of the incident)

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी एसआयटीची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर निलेश सोनावणे यांच्या नेतृत्त्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आता त्यांच्या नेतृत्त्वात होईल. विरोधकांनी या प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आमदारकी जाणार

गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांच्या गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आली आहे. त्यामुळे गायकवाड यांची आमदारकी जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नार्वेकर यावर काय निर्णय घेतील हे पाहावं लागेल.

उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यात गणपत गायकवाड यांनी सहा गोळ्या चालवल्या. त्यातील दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सदर घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

SCROLL FOR NEXT