ulhasnagar municipal commissioner vikas dhakne sakal
मुंबई

Ulhasnagar News : आयुक्त धावले सेवनिवृत्तांच्या मदतीला! 25-30 वर्षात मिळणारी कोट्यवधींची थकबाकी आता 10 महिन्यातच मिळणार

दिनेश गोगी

उल्हासनगर - शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची लाखों रुपयांची थकबाकी आहे. मात्र अवघे दोन हजार रुपये देण्यात येत असून मृत्यूपूर्वी तरी आम्हाला एकत्रित रक्कम मिळणार काय? अशी हाक देण्यासाठी शेकडो सेवनिवृत्तांनी कायद्याने वागा लोकचळवळच्या बॅनरखाली उल्हासनगर महानगरपालिकेसमोर आंदोलन केले होते.

या आंदोलनाची दखल घेऊन आयुक्त विकास ढाकणे हे सेवनिवृत्तांच्या मदतीला धावले असून आता महिन्याला दोन हजार ऐवजी 50 हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय ढाकणे यांनी घेतला आहे. त्यामुळे 25-30 वर्षात मिळणारी थकबाकी आता अवघ्या 10 महिन्यातच मिळणार असल्याने सेवानिवृत्त सुखावून गेले असून कायद्याने वागाने लढा जिंकला आहे.

या थकबाकीच्या अदायगीची सुरुवात दिवाळीपूर्वी 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता देऊन उल्हासनगर महानगरपालिका करणार आहे. तसं लेखी पत्र महानगरपालिका प्रशासनाने कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांना दिलं आहे. जवळपास दोन हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ देण्याचं नियोजन महापालिका प्रशासनाने केलं आहे.‌

2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेले 1032 कर्मचारी आणि 2016 नंतर निवृत्त झालेले 433 कर्मचारी गेली अनेक वर्षे 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या प्रतिक्षेत होते. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर आणि प्रहार जनशक्तीचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय धरणेही केले गेले.

सोमवार 23 सप्टेंबरपासून कर्मचारी बेमुदत उपोषण सुरू करणार होते. परंतु आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. एकरकमी रक्कम देणं शक्य नाही, थोडे थोडे देऊ यावर आयुक्त विकास ढाकणे आणि मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांचे म्हणणे होते.

मात्र राज असरोंडकर यांनी जोरदार किल्ला लढवल्यावर विकास ढाकणे यांनी आर्थिक वर्षाअखेर पर्यंत सर्व देणी चुकवू असं आश्वासन दिलं. महापालिकेची एकंदरीत स्थिती बघता ढाकणे यांनी अधिकचा 5 महिन्यांचा कालावधी मागितला. त्यास आंदोलकांनीही होकार दिला आहे. यावेळी मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे उपस्थित होते.

या चर्चेत राज असरोंडकर यांच्यासोबत ॲड. स्वप्नील पाटील, शैलेश तिवारी आणि सेवानिवृत्तांपैकी तानाजी पतंगराव, बाळासाहेब नेटके, नंदलाल समतानी, मनोहर पानसरे, भगवान कुमावत, रतन केदार, नितनवरे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

Nashik Accident : बसचालकाचा ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर पडला पाय; शिवशाहीने ठोकल्या दुचाक्या

Nashik Cyber Fraud : इडीकडून अटकेची भिती दाखवून 90 लाखांना गंडा; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT