Ulhasnagar:  sakal
मुंबई

Ulhasnagar: उल्हासनगर महानगरपालिकेचीच इमारतच झाली धोकादायक, 48 वर्षांची झाली इमारत

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Latest Marathi News : महानगरपालिकेची इमारत 48 वर्ष जुनी झाली असून ती धोकादायक झाली आहे.पावसाळ्यात इमारतींच्या अनेक भागांना गळती लागलेली असून त्यांच्या स्पॉटच्या दुरुस्तीच्या कामास सुरवात करण्यात आली आहे.

नगरपरिषद असताना 3 जून 1976 साली उल्हासनगर महानगरपालिकेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते.पुढे 1996 साली नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यावर मुख्याधिकारी यांची जागा आयुक्त आणि नगराध्यक्षांची जागा महापौरांनी घेतली.

मात्र इमारतीने जशी चाळीशी ओलांडली तसतशी पावसाळ्यात या इमारतीला गळती लागू लागली असून प्रवेशद्वाराच्या वरील छताचे प्लॅस्टर अनेकदा अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यात सुदैवाने कोणतीही अघटित घटना घडली नाही.

महानगरपालिकेची नवीन इमारत उभारण्याचे काम प्रस्तावित आहे.पण गळतीची आणि प्लॅस्टर कोसळण्याची बाब आयुक्त अजीज शेख यांनी गांभीर्याने घेऊन हे स्पॉट तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश कन्सल्टन अनिरुद्ध नाखवा,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस,शहर अभियंता तरुण शेवकानी यांना दिले.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता हर्षद प्रधान,नाखवा यांचे इंजिनिअर योगेश भोसले यांनी सर्वेक्षण करून गळतीचे आणि कमकुवत प्लॅस्टरचे स्पॉट शोधून काढले आहेत.

त्यात महानगरपालिकेच्या प्रवेश द्वारावरील छत,अकाऊंट कार्यालया समोरील पॅसेज,चतुर्थ श्रेणी महिलांचे चेंजिंग रूम आदी स्पॉटचा समावेश आहे.हे काम महानगरपालिकेचे कंत्राटदार सोनू खटवाणी करत असून एकेक पॅच घेऊन स्पेशल केमिकलने सर्व स्पॉटची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT