Ulhasnagar Crime Sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगरातील ग्रामीण दुकानात 4 कोटी 50 लाखाचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उल्हासनगरातील ग्रामीण भागा मधील नेवाळी नाक्यावरील किराणा दुकानात एमडी ड्रग्सचा साठा असल्याची माहिती मिळताच कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दुकानावर छापा टाकून तब्बल 4 कोटी 50 लाख 70 हजार रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला आहे.

त्यामुळे मोठे रॅकेट उध्वस्त होण्याची शक्यता कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी व्यक्त केली. नेवाळी नाका बदलापूर पाईपलाईन रस्ता,एकविरा ढाब्याजवळ राजेशकुमार प्रेमचंद तिवारी यांचे गायत्री नावाचे किराणा दुकान आहे.दुकानातून एमडी ड्रग्स पावडरची विक्री होत असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.

त्यानुसार शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता दुकानावर छापा टाकून झाडाझडती घेण्यात आली.त्यात 3 किलो 6 ग्राम एमडी ड्रग्स पावडर मिळून आली.या ड्रग्सची किंमत 4 कोटी 50 लाख 70 हजार आहे.

तिवारीला हा ड्रग्सचा साठा शैलेश राकेश अहिरवार याने पुरवला होता.आणि या अमली पदार्थाची तिवारी हा बेकायदेशीर रित्या विक्की करत होता.याप्रकरणी दुकानदार राजेशकुमार तिवारी याला अटक करण्यात आली असून शैलेश अहिरराव यांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाणार.दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषणच्या कारवाईने नशेचा बाजार उठल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT