मुंबईः वाढत्या कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता नवी मुंबई मनपाने संपूर्ण शहरात सध्या विनामास्क आणि सामाजिक अंतर न ठेवणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. तर दुसरीकडे एपीएमसी मार्केटबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांनी मांडलेल्या बस्तानाकडे तुर्भे विभाग दुर्लक्ष करीत असल्याने कोरोना संक्रमणाला खतपाणी मिळत आहे. त्यामुळे येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरात कोरोनाचा विळखा कमी होत असताना आता दिवाळी नंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शहरात कोरोना संक्रमण अधिक वाढू नये म्हणून अनलॉकच्या कालावधीत रस्त्यावर फिरताना मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, मनपाने बंधनकारक केले आहे. त्याप्रमाणे कारवाई देखील सुरू आहे. मात्र मनपानेच तयार केलेल्या या नियमांचा विसर बहुधा तुर्भे विभागाला पडला आहे. कारण एपीएमसी फळ मार्केट समोर सानपाडा रेल्वे स्थानकाकडून माथाडी भवनकडे जाणाऱ्या रस्स्यावर एपीएमसी वाहतूक शाखेपासून ते माथाडी भवन या दरण्यात येथील रस्त्यावर आणि पदपथावर शेकडो फेरिवाले लॉकडाऊनचे नियम धुडकावत अनाधिकृतपणे आपला व्यवसाय मांडत आहेत. त्यामुळे एकीकडे सर्व सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना अशा प्रकारे नियम धुडकावून व्यवसाय करणाऱ्या आणि कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या फेरीवाल्यांवर कधी कारवाई केली जाईल असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सध्या कोरोनाबाबत नियम तोडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करुन कोरोना संक्रमणाला खतपाणी घालणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष, पर्यावरण सेवा भावी संस्था
----------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Unauthorized peddlers outside APMC Corona rules break navi mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.