मुंबई

कोरोनातून सुटका होईल हो...पण 'येथे' राहिल्यावर दुसराच रोग जडेल त्याचे काय?

राहुल क्षीरसागर

ठाणे : स्वच्छतागृहांमध्ये असलेली अस्वच्छता, खाटांच्या आजूबाजूला प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे सम्राज्य अशी परिस्थिती आहे ठाणे महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांसह संशयितांसाठी तयार केलेल्या 'न्यु होरायझन' शाळेतील विलगीकरण कक्षाची. एखादी व्यक्ती क्वारंटाईनसाठी या ठिकाणी आल्यास दुर्दैवाना एखादा आजार जडून त्याची रुग्णालय वारी निश्चित, अशी येथील स्थिती. कोरोना आजारातून आमची सुटका होईल पण येथील घाणीमुळे आम्हाला दुसऱ्याच आजाराची लागण होईल, अशा प्रतिक्रिया दाखल होणाऱ्या रुग्णांकडून व्यक्त होत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. साध्याच्या घडीला महापालिका क्षेत्रातील बाधितांचा आकडा हा दीड हजारांच्या आसपास गेला असून मृतांचा आकडा पन्नाशीच्या पार गेला आहे. त्यामुळे शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवू लागली आहे.

त्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने हॉटेल, शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. त्यात घोडबंदर येथील न्यु होरायझन या शाळेत सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात मात्र मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एकदा या ठिकाणी रुग्णास अथवा संशयितास आणून ठेवल्यानंतर डॉक्टर देखील तपासणीसाठी अथवा गोळ्या औषधे देण्यासाठी येत नसल्याची ओरड येथील रुग्णांकडून करण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रुग्णांना झोपण्याची व्यवस्था करण्यात आली, त्या ठिकाणी सफाई कर्मचारी साफसफाईसाठी येत नसल्यामुळे खाटांच्या खाली तसेच आजुबाजूला प्लास्टिकच्या बाटल्या, इतर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. अशीच अवस्था तेथील स्वच्छतागृहांची देखील आहे. त्यामुळे रुग्णांमधून पालिका प्रशासना विरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. 

न्यु होरायझन शाळेतील विलगीकरण कक्षात असलेल्या असुविधांबाबत तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
 - संदिप माळवी,
उपायुक्त, ठाणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

Latest Maharashtra News Updates : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 12 नोव्हेंबरपासून होणार सुरु

SCROLL FOR NEXT