मुंबई - ते बाप-लेक मुंबईतील लोकलमधून प्रवास करत होते. लहानग्या आयशाला जोराची लघवी आली होती. बाबा म्हणत होते थांब जरा आयशा. मात्र लहानग्या आयशाला लघवी असह्य होत होती. सारखी बाबा बाबा करणाऱ्या आयशाकडे तिच्या बाबांना पाहवत नव्हतं. अखेर ट्रेनला सिग्नल लागला आणि लोकल ट्रेन थांबलेली पाहून बापलेक ट्रेनमधून उतरलेत. रात्रीची वेळ होती, आसपास अंधार होता, या अंधारामुळे बापलेकीला येणाऱ्या ट्रेनचा अजिबात अंदाज आला नाही आणि तिथेच क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
नक्की झालं काय ?
कल्याणकडे येणाऱ्या लोकलला ठाकुर्लीदरम्यान सिग्नल लागला. सिग्नल लागला म्हणून बापलेक आयशाच्या हट्टापायी ट्रेनखाली उतरलेत. मात्र, त्यांना अजिबातही मागमूस नव्हता की त्यांच्यासमोर काय येऊन ठेपणार आहे याचं. कल्याणवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धडधडत जाणारी लोकल भरधाव वेगाने आली आणि दोघांना काही कळण्यापूर्वीच या लोकलने त्यांना उडवलं. या दुर्दैवी अपघातात लहानग्या आयशा आणि अर्शद या बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
RBI चा फोटो काढण्यासाठी गेले होते मुंबईत
अर्शद, त्यांची पत्नी आणि मुलं मुंबईत फिरायला गेली होती. आयशाच्या शाळेत तिला रिझर्व्ह बँकेचा प्रकल्प देण्यात आलेला. यासाठी तिला RBI बिल्डिंगचा फोटो हवा होता. म्हणून सहकुटुंब हे सर्वजण मुंबईत आले होते. बँकेचा फोटो काढला आणि रात्री साडे नऊ वाजताच्या लोकलने हे कुटुंब कल्याणकडे निघाले होते. मात्र आयशीला लघवी असह्य झाल्याने ते ट्रेनखाली उतरले होते. अशातच दोघांना आपला जीव गमवावा लागलाय.
दरम्यान, या घटनेमुळे अर्शदच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. परिसरात देखील या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जातेय.
unfortunate train accident killed little aysha and his father arshad in thane
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.