मुंबई : देशातील प्रसिद्ध विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्श्युरन्समध्ये (United India Insurance) आठ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी (8 lac scam) पती-पत्नीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोघेही कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कामाला होते. याप्रकरणी कंपनीच्या वतीने मरिनड्राईव्ह पोलिस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल (FIR Filed) करण्यात आला होता. आरोपीने साथीदारांच्या मदतीने सात विविध बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा केल्याचे निष्पन्न झाले असून ही रक्कम तक्रारीपेक्षा अधिक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी कुशल सिंग (38) व त्याची पत्नी नीलम सिंग यांना अटक करण्यात आली आहे. ( United India Insurance company 8 lac scam couple arrested)
कुशल सिंग व त्याची पत्नी दोघेही कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामाला होते. कुशल हा कंपनीच्या चर्चगेट येथील कॉर्पोरेट शाखेत अकाउंट्स विभागात काम करत होता. याप्रकरणी कंपनीचे उपव्यवस्थापक जयदीप सिन्हा (56) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये अनियमितता असल्याची माहिती मुंबईतील खासगी बँकेने कंपनीला दिली होती. त्यानुसार चेन्नई येथील कार्यालयाकडून या अनियमिततेबाबतची माहिती सिन्हा यांच्या विभागाला मिळाली. त्यानुसार याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत आरोपी सिंग यांनी सात विविध खात्यांमध्ये रक्कम जमा करून गैरव्यवहार गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, 13 नोव्हेंबर 2020 ते 23 एप्रिल 2021 या कालावधीत आठ कोटी 9 लाख 98 हजार एवढी रक्कम सात विविध खात्यांमध्ये जमा केली आहे. ही रक्कम मुंबई व जयपूर येथील सात खात्यांवर जमा झाली आहे. विभागीय चौकशीत 21 संशयीत व्यवहारांद्वारे ही रक्कम या खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार मरिन ड्राईव्ह पोलिसांनी भादंवि कलम 409 व 120(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण याप्रकरणात फसवणूकीची रक्कम अधिक असल्यामुळे हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.