पोलिसांचे काम कायदा व सुव्यवस्था राखण्याचे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर आवर घालून जनतेचे सर्वतोपरी रक्षण करण्याचे; पण सन २०२० हे वेगळेच काम घेऊन आले. संसर्गापासून जनतेला दूर ठेवण्याचे काम. शत्रू वेगळाच, भलताच. इथे दंडुके, बंदुका कामाच्या नाहीत; तर शस्त्र असणार हृदयाची भाषा. मुंबई या महामारीने वेढली असताना नाक्या-नाक्यावर पोलिस उभे होते अन् गृहमंत्री अनिल देशमुख त्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देत होते.
पुरोगामी महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून निश्चितच एक महत्त्वाची जबाबदारी आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचा ध्यास मनात ठेवून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या कामकाजाची सुरुवात केली. कालगणनेनुसार हा कालावधी कमी असला, तरी संपूर्ण जगावर कोसळलेल्या कोरोना संकटामुळे या कालावधीत दुप्पट काम करावे लागले. अर्थातच कायदा व सुव्यवस्थेसोबत नागरिकांच्या, राज्याच्या आणि राष्ट्राच्या स्वास्थ्याची हमीदेखील महत्त्वाची.
संपूर्ण देशात २४ मार्चपासून कोरोनाप्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता हा लॉकडाऊन पुढे वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले होते. विविध कारणांनी ते घराबाहेर येत. महत्त्वाच्या कामाखेरीज त्यांनी रस्त्यावर येऊ नये, यासाठी पोलिस २४ तास रस्त्यावर उभे होते. गृहमंत्रीदेखील या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात फिरले. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. त्यांच्या कामाचे कौतुक केले. संबंधित विभागीय आयुक्त, आय.जी. पोलिस, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अधिकारी, तेथील पदाधिकारी यांच्यासोबत कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.
हे सर्व करीत असताना त्यांच्या लक्षात आले की, राज्यात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यासाठी रिक्त पदे भरणे महत्त्वाचे. म्हणूनच पोलिस दलातील सुमारे१२ हजार ५२८ रिक्त पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
राज्यातील माता-भगिनी या सदैव सुरक्षितच राहिल्या पाहिजेत, हे गृहमंत्र्यांचे कर्तव्य. म्हणूनच महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी राखी पौर्णिमेला गृहमंत्र्यांना राखी बांधून राज्यातील सर्व माता-भगिनींना संरक्षणाची हमी दिली.
पोलिस दलासाठी घेतलेल्या निर्णयामध्ये मुख्यत्वे कोव्हिडसंसर्गामुळे मृत्यू झाल्यास कर्तव्यावरील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबास ५० लाखांचे सानुग्रह अनुदान. राज्य पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड- १९ मुळे निधन झाल्यास सरकारी निवासस्थाने त्यांच्याकडेच ठेवण्याची मुभा. कोरोनाचा संसर्ग तुरुंगात होऊ नये म्हणून जवळपास ११ हजार कैद्यांची तात्पुरत्या पॅरोल जामिनावर सुटका. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कोव्हिड सेंटर स्थापन केले. महाराष्ट्र पोलिस कुटुंब योजनेंतर्गत राज्यातील नामांकित रुग्णालयात कोव्हिड- १९ साठी रोकडविरहित उपचार अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.
दिवाळीही पोलिसांसोबत
गृहमंत्री अनिल देशमुख दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाला चक्क नक्षल भागातील म्हणजे गडचिरोलीपासून ३०० कि.मी. लांब असलेल्या दुर्गम भागात सहकुटुंब गेले आणि तेथील पोलिसांसमवेत आपली दिवाळी साजरी करून त्यांच्यासह स्वत:चा आनंद द्विगुणीत केला. यापूर्वी त्यांनी पुणे/मुंबई महामार्गावरील पोलिस चेकिंग पोस्टवर कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा वाढदिवसदेखील तेथेच साजरा केला होता; तर एका पोलिस भगिनीच्या हस्ते बुलडाणा जिल्हा पोलिसांच्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करून आदर्शवत पायंडा सुरू केला. स्वत:ला केवळ कुटुंबप्रमुख म्हणून संबोधताना ‘बोले तैसा चाले’ या म्हणीप्रमाणे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून गृहमंत्री अनिल देशमुख कुटुंबप्रमुखाची जबाबदारीदेखील समर्थपणे पार पाडत आहेत. नाक्यावर बंदोबस्तासाठी उभे असणारे पोलिस कोरोनाबाधित होत. त्यांना मदत करण्याचे, धीर देण्याचे काम हे अनिल देशमुखांनी स्वत:च्या शिरावर घेतले.
---------------------------------------------------
Unmasking Happiness Anil Deshmukh is a strong support of police in Corona epidemic marathi latest news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.