मुंबई

Unmasking happiness | पोस्टकोव्हिडमध्ये पल्मनरी फायब्रोसिसची चिंता नको!  आजार सावकाशपणे बरा होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

भाग्यश्री भुवड

मुंबई: शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक मोठा अवयव म्हणजे फुप्फुस. कोविडमध्ये सर्वाधिक जास्त परिणाम हा फुप्फुसावर होत आहे. त्यासंबंधित अनेक विकार आता समोर आले आहेत. त्यातही पोस्ट कोविडमध्ये फुप्फुसावर झालेला परिणाम हा सर्वाधिक आहे. त्यातही लोकांमध्ये फुप्फुसाचा पल्मनरी फायब्रोसिस होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अजूनही बरेच रुग्ण या आजारासह वेगवेगळ्या रुग्णालयात सुरू केलेल्या पोस्ट कोविड ओपीडीत येत आहेत. मात्र, फायब्रोसिस हा सावकाश बरा होणारा आजार असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडला आहे. फुप्फुसांमध्ये मिलियन्स वायुकोश असतात. मुंबईच्या केईएम रुग्णालयात गेल्या महिन्यापर्यंत फायब्रोसिस आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 104 रुग्णांचा अभ्यास केला गेला. त्यातून हा आजार बरा होण्यासारखा आहे असे निदर्शनास आले आहे. 

आपण नाकावाटे श्वास घेतो. शुद्ध हवा श्वासनलिकेतून वायूकोषांपर्यंत पोहोचते. फुफ्फुसामध्ये काही दश लाख वायुकोश असतात. व त्या भोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. फुप्फुसाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 140 स्केवर मीटर इतके असते. कोविड-19 हा आजार होऊन गेल्यानंतर फुफ्फुसांमध्ये काही जास्त काळ न्यूमोनिया व त्याचबरोबर रक्त गोठल्याने झालेला थ्रम्बोसिस बरे व्हायला लागतात. यात फुफ्फुसाचे प्राणवायू शोषणाचे कार्य मंदावलेले दिसते. त्याकरीता योग्य काळजी घेतल्यास बहुतांश हे बरे होत आहेत असे श्वसनविकार चिकित्सा विभागाच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी सांगितले. 

वेळ लागतो पण, बरा होतो

फायब्रोसिसमध्ये जरी वेळ लागला तरी लोकांनी योग्य काळजी घेतली तर तो बरा होऊ शकतो. रुग्णालयात जर एखादी व्यक्ती फुप्फुसाच्या फायब्रोसिसची समस्या घेऊन आली तर आधी ऑक्सिजनची पातळी, रक्तदाब आणि नाडीचा वेग इ. तपासला जातो. त्यानंतर काही रक्ताच्या चाचण्या व फुप्फुस क्षमतेची चाचणी करुन त्रासाची तीव्रता तपासली जाते आणि योग्य निदानावर उपाययोजना ठरतात. एक्स-रे किंवा सिटी स्कॅनवर एकाच सारख्या दिसणार्या न्यूमोनियाचे कारण वेगवेगळे असू शकते.  आपल्याला होणारा त्रास नेमका काय आहे? हे जाणून घेऊन प्रकृती सुधारेपर्यंत पुरेशी काळजी घ्यायची आहे. 

जवळपास 80 टक्के रुग्ण फायब्रोसिसमधून रिकव्हर

केईएम रुग्णालयातील जवळपास 80 टक्के रुग्ण हे फायब्रोसिसमधून बरे झाले आहेत. मात्र, काही जणांना अजूनही ऑक्सिजनची गरज भासते. शिवाय, हा फायब्रोसिस वेगळ्या प्रकारचा असून याच्यात रक्त गोठण्याच्या क्रियेचा सहभाग सक्रिय आहे. त्यामुळे, रक्त गोठण्याची क्रिया तपासून घेऊन अनेकदा रक्त पातळ होण्याची औषधं दिली जातात. ती दुधारी ही शस्त्रे आहेत. कधी कधी यातून रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण वाढते. 

कोविडमध्ये होणारा फायब्रोसिस आणि थ्रम्बोसिस संयोजन

कोविडमध्ये होणारा फायब्रोसिस हा फुप्फुसाचा फायब्रोसिस आणि थ्रम्बोसिस याचे संयोजन आहे. रक्त गोठल्यानंतर ऑक्सिजन शोषण्याचे कार्य पुरेसे होत नाही. त्यातून रक्त साखळते. यातून थ्रम्बोसिस होतो. जखम झाली तर त्याचे व्रण राहतात. तसेच फुप्फुसात कोविड झाल्यानंतर न्यूमोनिया झाल्यासारखी लक्षणे दिसली. तो भाग घट्ट होऊन फायब्रोसिस झाला असे दिसले. त्यानंतर, फुप्फुसाला आलेली सूज आणि जखमा भरुन काढण्यासाठी औषधे दिली जातात. रक्त पातळ होण्यासाठी औषधं दिली जातात. 

मनाची शक्ती महत्त्वाची 

फायब्रोसिस झालेले रुग्ण घाबरुन रुग्णालयांपर्यंत पोहचत आहेत. तो बरा होणार नाही अशी भीती लोकांमध्ये आहे. यात लोकांना जास्त अशक्तपणा आणि थकवा जाणवतो आहे. पण, या सर्वात मनाची शक्ती फार महत्त्वाची असते हे ही डॉ. आठवले यांनी स्पष्ट केले आहे. 

ऑक्सिजनचे काम महत्त्वाचे

या सर्व प्रक्रियेत ऑक्सिजनचे काम महत्त्वाचे ठरते. कारण, सामान्यपणे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर संपूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित आणि सुरळीत चालते. पण, जर ऑक्सिजनची कमतरता भासू लागली तर हृदयाचे काम दुपटीने वाढते. इतर अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे, ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. कधी कधी एखाद्या रुग्णाला जर ऑक्सिजनचा गरज असेल तर ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर वापरला जातो जो स्थलांतरीत करता येतो. शिवाय, ऑक्सिजन ही ज्वालाग्राही आहे. त्यामुळे तो हाताळताना तो व्यवस्थित हाताळावा असेही डॉ. आठवले यांनी सांगितले.

Unmasking happiness No need to worry about pulmonary fibrosis in postcovid Medical experts believe that the disease is slowly healing

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT