मुंबई

आगामी निवडणुकांसाठी विशेष रणनीती, युतीसाठी महाराष्ट्रातील बडा नेता घेणार फडणवीसांची भेट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आरपीआय युती करण्याबाबत आपण लवकरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे किमान 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी आताच प्रभाग निश्‍चित करून तयारीला लागा, असे आवाहनही आठवले यांनी केले. MIG क्‍लब येथे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी रिपाइंच्या मोजक्‍या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात आठवले यांनी पालिका निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि रणनीती ठरविण्याबाबत चर्चा केली. बैठकीत मुंबईत संघटनात्मक बांधणी करताना मतदार यादीनुसार बूथप्रमुख निवडण्याची सूचना रिपाइंचे युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली. भाजपच्या कमळ चिन्हावर रिपाइं कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची सूचना ज्येष्ठ नेते चंद्रकांत कसबे यांनी केली. 

गुणवत्तेनुसार उमेदवारी! 

पालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र आव्हान उभे करेल. त्यांच्याविरुद्ध भाजप आणि आरपीआय युती करून लढेल. आपापले प्रभाग निश्‍चित करून आतापासूनच तयारी करावी. उमेदवारी देताना केवळ जिंकून येण्याची गुणवत्ता लक्षात घेऊन उमेदवारी दिली जाईल. ज्येष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांबरोबरच नव्या कार्यकर्त्यांना; विविध जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांनाही रिपाइंची उमेदवारी दिली जाईल. त्यात बौद्ध मातंग, मुस्लिम, मराठा, हिंदी भाषिक, गुजराती, तमीळ, कन्नड भाषिक अशा सर्वांना रिपाइंतर्फे उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणा आठवले यांनी केली. 

upcoming elections RPI leader ramdas athawale to meet bjp leader devendra fadanavis

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT