मुंबई

'500 यूपीएस'च्या नावाने पाच कोटींची उधळपट्टी? "नायर'मधील प्रस्तावाभोवती संशयाची सुई

मिलिंद तांबे

मुंबई : संगणक प्रणालीसाठी गरज नसताना 500 यूपीएस खरेदी करण्याचा घाट नायर रुग्णालय प्रशासनाने घातला आहे. त्यावर 5 कोटी रुपयांची उधळपट्टी होणार आहे. त्याबाबतचा प्रस्तावही पालिकेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. जनरेटरवर काम होणार असताना यूपीएसवर एवढा खर्च कशासाठी, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. त्याची दखल घेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संबंधित प्रस्ताव फेटाळून तो नव्याने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

नायर रुग्णालयात संगणकीय प्रणालीचा सर्वाधिक वापर होतो. त्याशिवाय तिथे एचआयएमएस प्रणाली (हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम) सुरू आहे. त्यासाठी रुग्णालयातील 500 संगणकांना तेवढेच यूपीएस बसवण्याचा निर्णय नायर रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी 5 कोटी खर्चाचा प्रस्तावही बनवण्यात आला आहे. मंजुरीसाठी तो पालिकेकडे पाठवण्यात आला; मात्र आता त्याबाबतच संशय व्यक्त केला जात आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईत अचानक वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा परिणाम नायर रुग्णालयातील संगणकीय यंत्रणेवर झाला होता. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने 10 ते 12 इमारतींमध्ये जनरेटर लावून घेतले; मात्र जिथे रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो शिवाय एचआयएमएस प्रणाली चालवली जाते, त्या इमारती मात्र त्यातून वगळण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

संगणकांना 500 यूपीएस यंत्रणा लावण्यापेक्षा इमारतीत जनरेटर का लावले नाही, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. सर्व संगणक केवळ 57 सर्व्हरवर सुरू असताना त्यासाठी 57 यूपीएस घेण्याची गरज आहे. असे असताना 500 यूपीएस घेण्याचा घाट का, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात येत आहे. सुरेश काकाणी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी नवीन प्रस्ताव आणण्याचे आदेश दिले आहेत. 

72 यूपीएस धूळ खात पडून 
पंतप्रधान निधीतून पालिकेच्या काही रुग्णालयांना यूपीएस देण्यात आले. अन्य रुग्णालयांनी त्याचा वापर रुग्णालयामध्ये केला; मात्र "नायर'ला मिळालेले 72 (1 केव्ही) यूपीएस धूळ खात पडले आहेत. त्याबाबत वारंवार विचारणा करूनही संबंधित अधिकारी ते यूपीएस नायर रुग्णालयाच्या खोलीमधून बाहेर काढण्यास तयार होत नाही. 12 ऑक्‍टोबरला वीज खंडित झाली, तेव्हा ते यूपीएस उपयोगात आणता आले असते; मात्र त्याने ते बसवू दिले नाहीत. त्यामुळे डॉक्‍टरांना व्हेंटिलेटरवरील रुग्णाची सेवा करताना तारेवरची कसरत करावी लागली, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

एका अधिकाऱ्याचा "अट्टहास' 
वीजपुरवठा खंडित झालेल्या कालावधीत 72 यूपीएस वापरता येणे शक्‍य होते; मात्र त्याला एका अधिकाऱ्याने विरोध केला. इतकेच नाही, तर त्याने 72 पैकी 35 यूपीएस परस्पर पुणे जिल्ह्यात पाठवले. त्यानंतर त्याच अधिकाऱ्याने त्याच प्रकारच्या 500 नवीन यूपीएस खरेदीसाठीचा प्रस्ताव बनवण्याचा घाट घातल्याचे बोलले जात आहे. 

500 यूपीएस घेण्याचा प्रस्ताव मी परत पाठवला आहे. नवीन प्रस्ताव बनवण्यास सांगितले आहे. नवीन प्रस्तावात आवश्‍यकतेनुसार बदल होतील. काही त्रुटी असल्यास तपासून घेऊ. 
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त, पालिका 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT