Uran Murder Case update esakal
मुंबई

Uran Murder Case: उरण हत्याकांडात मोठी अपडेट! २०१९ मध्ये पीडितेच्या वडिलांनी संशयितावर केला होता हल्ला

Uran Murder Case latest updates and news: प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. २०१९ मध्ये उरणमध्ये दाऊद आणि यशश्रीची भेट झाली होती, जेव्हा ते मजूर म्हणून काम करत होते.

Sandip Kapde

नवी मुंबईतील उरण हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. यशश्री शिंदे हिच्या खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून दाऊद शेख याचे नाव समोर आले आहे, जो पीडितेचा प्रियकर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने श्रद्धा वॉकर हत्याकांडाची आठवण करून दिली आहे. दाऊद शेख हा यशश्रीला पाच वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होता.

घटनेचा तपशील-

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय महिलेचा मृतदेह शनिवारी उरण रेल्वे स्थानकाजवळ झुडपांमध्ये आढळून आला. तिच्या शरीरावर जखमांचे निशान होते. पोलिसांनी तपासात यशश्रीवर अनेकदा चाकूने वार केल्याचे आढळले. या प्रकरणात दाऊद शेख याला मुख्य संशयित म्हणून ओळखण्यात आले आहे.

२०१९ मध्ये झालेली घटना-

दरम्यान, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. २०१९ मध्ये उरणमध्ये दाऊद आणि यशश्रीची भेट झाली होती, जेव्हा ते मजूर म्हणून काम करत होते. यशश्रीच्या कुटुंबीयांना त्यांच्या मैत्रीबद्दल समजल्यावर, वडिलांनी सार्वजनिक ठिकाणी दाऊदवर हल्ला केला होता. त्याचवेळी दाऊदवर लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फ्री प्रेस जर्नलने याबाबात वृत्त दिले आहे.

दाऊद शेखची पाच वर्षांपूर्वीची कुंडली-

२०१९ मध्ये यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेखवर एफआयआर दाखल केली होती. त्यावेळी यशश्री अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दाऊदला अटक करण्यात आली होती आणि जामीन मिळाल्यानंतर तो कर्नाटकला गेला. कॉल रेकॉर्डवरून हे स्पष्ट झाले आहे की दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.

संशयिताचा इतिहास-

त्यानंतर पोलिसांना शंका आहे की इतक्या वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याबद्दल आणि 2019 मध्ये अटक केल्याबद्दल दाऊदला यशश्रीच्या वडिलांबद्दल राग होता.

हत्या आणि तपास-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये यशश्रीच्या वडिलांनी दाऊदवर एफआयआर दाखल केली होती, ज्यात त्यांनी शेखवर त्या वेळी नाबालिग असलेल्या यशश्रीसोबत चुकीचे वर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

कुटुंबाचा आरोप आहे की दाऊद पुन्हा यशश्रीच्या संपर्कात आला आणि तिच्या मृत्यूपूर्वी दोघांमध्ये संभाषण झाले होते. पोलिसांच्या मते, दाऊदने कर्नाटकहून उरणमध्ये येऊन यशश्रीला बोलावून तिची निर्घृण हत्या केली आणि पळून गेला. आरोपीच्या अटकेनंतरच या हत्याकांडामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT