urban agriculture in municipal school Vegetables will used for mid-day meal school student education sakal
मुंबई

Mumbai : पालिका शाळांमध्ये शहरी शेतीचा प्रयोग; भाजीपाल्याचा उपयोग मध्यान्ह भोजनासाठी होणार

पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शेतीकडे ओढ निर्माण व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शेतीकडे ओढ निर्माण व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार

मुंबई - डिजिटल युगात स्पर्धा सुरू असली तरी माणसाची मातीशी नाळ घट्ट असल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शेतीकडे ओढ निर्माण व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील पालिकेच्या शाळांमध्ये शहरी शेतीचा प्रयोग राबविण्यास सुरूवात केली आहे. शाळांमधून पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यांचा वापर मुलांच्या मध्यान्ह भोजनांमध्ये होणार आहे.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांना विविध विषयांत प्रोत्साहन देण्यात येत आहे. माटुंगा येथील वाघजी केब्रिज शाळेसह चेंबूरमधील शाळेत शहरी शेतीअंतर्गत छतावरील शेती अर्थात रुफ गार्डनिंगची संकल्पना राबवण्यात आली.

आता ही संकल्पना महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये राबवण्याचा मानस आहे. या शाळांमधून पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यांचा वापर मुलांच्या मध्यान्ह भोजनांमध्ये करण्याचा विचार महापालिका शिक्षण विभागाचा आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुले आता खऱ्या अर्थाने शेतकरी बनवणार असून स्वत: भाजी पिकवून स्वत:च्या मध्यान्ह भोजनाची सोय करणार आहेत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

पर्यावरणीय बदलांबाबतचे शिक्षण हे केवळ पुस्तकी मर्यादित न ठेवता या शिक्षणाचा दैनंदिन आयुष्यात वापर करण्यासाठीचे धडे महानगरपालिकेच्या माटुंग्यातील एमपीएस एल. के. वाघजी शाळेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, पालकांचा आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता.

नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या १५४ मुलांच्या सहभागातूनच नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीची संकल्पना राबवण्यात आली. त्यासोबतच शहरी शेतीमध्ये छतावरील (रूफ) गार्डनिंगलाही प्रोत्साहन देण्यात आले. शहरी शेतीमध्ये छतावरील (रूफ) गार्डनिंगलाही प्रोत्साहन देण्यात आले. वाघजी शाळेप्रमाणे चेंबूर कलेक्टर शाळेतही अशाप्रकारच्या शहरी शेतीचा प्रकल्प राबवण्यात आला.

या दोन्ही शाळांमध्ये राबवण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगानंतर महापालिकेच्या २५० शालेय इमारतींमध्ये शहरी शेती उपक्रम राबवला जाणार आहेत. त्यामुळे ६०० ते ७०० शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाण्याचा मानस महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आहे.

विद्यार्थ्यांना होणारा फायदा

मुंबईत स्थायिक झालेल्या बहूतांश नागरिकांचा ग्रामिण भागाचा संबंध तुटला आहे. त्यामुळे शेतीशी विद्यार्थ्यांचा संबंध राहिलेला नाही. विद्यार्थ्यांचे शेतीशी नाते निर्माण व्हावे, शेतीची मशागत कशी करावी, पीक कसे तयार करावे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पर्यावरणाशी सुसंगत हा उपक्रम असून पर्यावरणाचे त्यामुळे रक्षण होण्यास मदत होईल.

शहरी शेतीचा प्रयोग करताना विद्यार्थ्यांना संघटित काम करता येईल. ताज्या भाज्या आणि फळे शहरी शेतीमुळे मिळू शकेल. एकत्रित काम करण्याचा सामाजिक संदेशही त्यानिमित्त विद्यार्थ्यांना मिळेल. शेतीविषय विद्यार्थ्यांच्या जाणीवा समृध्द होती, भविष्यात विद्यार्थ्यांना शेतीविषयी जिज्ञानासा निर्माण व्हावी तसेच विद्यार्थी शेतीकडे वळावे, शेतीचे महत्व शहरी विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, हा उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शहरात व्यवसायिक शक्य आहे का, याचीही चाचपणी या निमित्ताने चाचपणी होण्याची शक्यता आहे.

शेतीविषयी मुलांना संवेदनशील बनविणार

मुलांना शेतीविषयक कामांमध्ये आवड करण्याचा हा प्रयत्न असून शेती सारख्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे हाही प्रयत्न आहे. मात्र, यासाठी महापालिकेचा निधी खर्च केला जाणार नसून यासाठी आवश्यक असणारा निधी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अजित कुंभार, सहआयुक्त शिक्षण विभाग, मुंबई महानगर पालिका

प्रयोग यशस्वी

माटुंगा येथील वाघजी केब्रिज शाळेसह चेंबूरमधील शाळांत शहरी शेतीअंतर्गत छतावरील शेती अर्थात रुफ गार्डनिंगची संकल्पना राबवण्यात आली आहे. या शाळांमधील प्रयोग यशस्वी होत आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT