डेटिंग अॅप्सवरून आपला लव्ह पार्टनर किंवा लाईफ पार्टनर शोधण्याचा ट्रेंड आहे. यातून आपल्याला हवा असणारा परफेक्ट पार्टनर शोधला जातो. मात्र यासंदर्भात आता एक वेगळी आणि आश्चर्यचकित करणारी बातमी समोर येत आहे. या डेटिंग अॅपचा वापर करत एकाने रक्षाबंधनला स्वतःसाठी चक्क बहीण शोधली आहे. "रक्षाबंधनसाठी बहीण शोधत आहे," हे त्याचे टिंडर बायो चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. (Raksha Bandhan 2022)
ही घटना ऐकल्यानंतर अनेकांना हे हास्यास्पद वाटत असले तरी मुंबईतील माणसाची ही युक्ती त्याला बहिण शोधण्याच्या कामी आली आहे. अॅपच्या मदतीने त्याने स्वतःसाठी एक नाही तर दोन बहिणी मिळवल्या आहेत. त्यामुळे त्याचे रक्षाबंधन आनंदात साजरे होणार आहे. सध्या या बातमीची जोरदार चर्चा सोशल मीडियावरही सुरु आहे.
रक्षाबंधनसाठी दोन बहिणी शोधण्यात मदत केल्याबद्दल या व्यक्तीने टिंडरचे आभार मानले आहेत. त्याने म्हटलंय की, टिंडरमुळे आता मला दोन बहिणी आहेत. या वर्षी आम्ही तिघेजण एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे करण्याचा आणि भेटवस्तू आणि इतर देवाणघेवाण करण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे टिंडरचे खूप आभार.. यंदा माझे रक्षाबंधन साजरे होणार असल्याने मी खूप आनंदी आहे, असेही त्याने लिहिले आहे.
या Reddit.युजरने आपल्याला आयुष्यभर रक्षाबंधनाच्या दिवशी FOMO कसे वाटत होते. या व्यक्तीला बहीण नसल्याने राखी बांधण्यासाठी कुणीही नव्हते. रक्षाबंधनाच्या सणाला तो कोणसाठीही भेटवस्तू खरेदी करू शकत नव्हता. रक्षाबंधनासाठी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी त्याने आपला टिंडर बायो बदलला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो बहिणीच्या शोधात आपला बायो बदलत होता. या वर्षी मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याला दोन बहिणी मिळाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.