Use of letterhead even after term of office of corporator over police refused to take action esakal
मुंबई

Mumbai News : नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही लेटरहेडचा वापर

सात महिन्यानंतरही पोलिसांकडून कारवाईसाठी टाळाटाळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे बोधचिन्ह असलेल्या लेटरहेडचा वापर करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातच आपण नगरसेवक असल्याचा उल्लेख करून पोलिसात तक्रार करण्याचाही प्रताप समोर आला आहे.

अशा पद्धतीचा लेटरहेडचा वापर करणे हे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८नुसार बेकायदेशीर आहे. याविरूद्ध वरळी पोलिस ठाण्यात सात महिन्यानंतरही काहीही कारवाई झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा नागरिकायन संस्थेने केला आहे.

पहिले तीन महिने तर वरळी पोलिस ठाण्याने काहीही कारवाई केली नाही. एकदा जबाब नोंदविण्यासाठी मला बोलावले पण तपास अधिकारीच आले नाही. तक्रार अर्जावर काय कारवाई केली याची माहिती अधिकारात माहिती मागितली.

तर दीड महिन्याने उत्तर दिले की चौकशी चालू आहे. म्हणजे ७ मार्च २०२२ रोजी कार्यकाळ संपला आणि १२ मार्च २०२२ रोजी लेटरहेडचा वापर केला गेला हे इतकं धडधडीत दिसत असूनही पहिले ४ महिने झाले तरी फक्त तपासच चालू होता असा आरोप नागरिकायन संस्थेचे पदाधिकारी आनंद भंडारे यांनी म्हटले आहे.

परिमंडळ ३च्या उपायुक्त यांना भेटून सांगितले की ४ महिने झाले तरी माझा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. त्यांनी तोंडी आदेश दिल्यानंतर तपास अधिकाऱ्याच्या सहाय्यकाने माझा जबाब नोंदविला.

या प्रकरणात काय कारवाई झाली त्याची कागदपत्रे पुन्हा एकदा माहिती अधिकारात मागितली. कागदपत्रांमध्ये ज्या जबाबाबर माझी सहीच झालेली नाही तो माझा अंतिम जबाब म्हणून रेकॉर्डवर नोंदविलेला आहे. सहा महिने झाले तरी संबंधित माजी नगरसेवकाचा अजून साधा जबाबही नोंदविलेला नाही असेही लक्षात आले आहे.

या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्याने काय कारवाई केलेली आहे? तर जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवले आहे की संबंधित प्रकरणी आपल्या अधिकाऱ्याला तक्रार नोंदविण्यास पाठवावे किंवा कार्यकाळ संपल्यानंतरही लेटरहेडचा वापर करणे हे बेकायदेशीर आहे की नाही ते कळवावे, अशा आशयाचे पत्र लिहिण्यात आले आहे.

विधी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लेटरहेडचा वापर करणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारानंतर फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. तरीही महापालिकेच्याच अधिकाऱ्यांनी तक्रार करावी, असा वरळी पोलिस ठाण्याचा आग्रह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT