मुंबई

नको मोबाईल, नको कार्ड; आता फक्त चेहरा दाखवा आणि पेमेंट करा, कसं...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशात हळू हळू कॅश पेमेंट करण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे. लोकांनी google  pay, BHIM अशा ऑनलाईन मनी ट्रान्सफरचा पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरुवात केली आहे. मात्र यात नवीन टेक्नॉलॉजी आणण्याची कल्पना RBI नं मांडली आहे. यानुसार आता पेमेंट करताना कार्डचा वापर करण्याची काहीही गरज नसणार आहे. 'फेशियल रेकग्निशन टेक्नोलॉजी' या टेक्नॉलॉजीमुळे आता तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या मदतीनं पेमेंट करू शकणार आहात.

त्यामुळे तुम्ही काही गोष्टी खरेदी केल्यानंतर पैसे भरण्याच्या रांगेत उभं नं राहता फक्त आपला चेहरा दाखवून पेमेंट पूर्ण करता येणार आहे. चेहरा दाखवून थेट आपल्या खात्यातून खरेदी केलेल्या वस्तुंचे पैसे वजा होणार आहेत. या पेमेंट टेक्नॉलॉजीवर सध्या आरबीआयकडून काम सुरू आहे. भारतात ही सिस्टिम सुरक्षितपणे लाँच करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. लवकरच ही टेक्नॉलॉजी देशात सर्व ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याचं आरबीआयकडून सांगितलं जात आहे.

मोठी बातमी पोलिसांच्या हाती लागलं ८० कोटींचं 'म्याऊ म्याऊ'चं घबाड...

असं करता येईल 'फेशियल पेमेंट' :

  • तुमची खरेदी झाल्यानंतर जेंव्हा तुम्ही पैसे भरायला जातात तेंव्हा कॅमरासोबत कनेक्ट असलेल्या पीओएस मशीन समोर उभं राहिल्यानंतर तुमचा  चेहरा स्कॅन होणार आहे.
  • मात्र यासाठी आधी बँकेत तुम्हाला अकाऊंटसोबत फेस स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतरच ही पुढची प्रोसेस तुम्हाला करता येणार आहे.  
  • बायोमेट्रिक सॉफ्टवेअरच्या आधारे फेस रेकग्निशन केलं जाणार आणि त्याद्वारे प्रत्येक चेहऱ्यानुसार सिस्टीममध्ये अलगोरिदम आपोआप तयार होईल. या अलगोरिदमच्या मदतीनं आपण आपला चेहरा दाखवला की पेमेंट होऊ शकतं.  अशाप्रकारे ही टेक्नॉलॉजी असणार आहे.
  • अर्थात ही सर्व प्रोसेस कार्ड पेमेंटच्या प्रोसेसपेक्षा सोपी आणि तुमचा वेळ वाचवणारी ठरणार आहे.

सध्या चीनमध्ये ही टेक्नोलॉजीचा सगळ्यात जास्त वापरली जाते. आपला चेहरा हीच पेमेंट करण्याची सर्वात सुरक्षित पद्धत असल्याच  तिथे मानलं जातं. शंभरहून अधिक शहरांमध्ये सध्या ही टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. त्यामुळे भारतात ही टेक्नॉलॉजी आली तर लोकांचा वेळ वाचणार आहे हे निश्चित.    

use your face for payments Reserve bank of india working on facial recognition technology

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT