विरार: उत्तरप्रदेशातील (uttar pradesh) एका इसमाची त्याच्याच गावातील एका इसमाने आपल्या साथिदारासह गळा आवळून हत्या (murder) करून मृतदेह मुंबई-अहमदाबाद हायवेवर (mumbai-ahmadabad highway) फेकून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हाती लागल्यानंतर वालीव पोलिसांनी (waliv police) अवघ्या दोन दिवसात मारेकऱ्यालाही गजाआड (culprit arrested) केले आहे.
भोलेनाथ गोस्वामी (36) असे मृत इसमाचे नाव असून तो उत्तरप्रदेशातील भदोही जिल्ह्यातील रहिवाशी आहे. भोलेनाथ काही दिवसांपूर्वीच नालासोपारा पूर्वेकडील आंबावाडी येथे राहणाऱ्या आपल्या मामाच्या घरी आला होता. मात्र, 20 ऑगस्टपासून भोलेनाथ बेपत्ता झाल्याची तक्रार 21 ऑगस्टला त्याच्या मामाने तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
दरम्यान, शनिवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवरील बापाणे पूलापुढे कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता. हरवलेल्या व्यक्तीच्या माहितीवरून सदरचा मृतदेह भोलेनाथचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वालीव पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
तपासात पोलिसांनी कॉल रेकॉर्डवरून ठाणे येथे राहणाऱ्या मुकेश गुप्ता याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भोलेनाथला आपला साथिदार कमल कुमार कोरी यांच्या मदतीने गळा आवळून ठार मारल्याची कबुली दिली. मुकेश गुप्ता हा भोलेनाथ याच्या गावातीलच आहे. मुकेशने भोलेनाथकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. भोलेनाथ पैशांसाठी मुकेशच्या मागे लागला होता. मुकेशला पैसे परत करायचे नसल्याने त्याने भोलेनाथचा काटा काढायाचा निर्णय घेतला होता.
मुकेशने 20 ऑगस्टच्या संध्याकाळी भोलेनाथला नायगाव रेल्वे स्टेशनजवळ पैसे घेण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर मुकेशने आपला साथिदार कमल कोरी याच्यासह रिक्शातून भोलेनाथला मुंबई-अहमदाबाद हायवेवरून गुजरातच्या दिशेने नेले. तसेच त्याला दारुही पाजली. त्यानंतर रात्री रिक्शातच त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह बापाणे पूलापलिकडे झाडाझुडपात टाकून दोघेही ठाण्याला निघून गेले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.