arrest 
मुंबई

उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा आला गोत्यात, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातून अटक

सकाळवृत्तसेवा

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणा-याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून अटक केली होती. त्याला सोडून द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, अशी धमकी उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला देणाऱ्या नाशिकवरून एटीएसने ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी लखनौ पोलिस मुख्यालयातील सोशल मीडिया हेल्प डेस्कवर निनावी संदेश आला होता. संदेश करणाऱ्या व्यक्तीविरोधात गोमती नगर पोलिस ठाण्यात अंतर्गत धमकी देणे व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती घेतली घेतला. त्यावेळी आरोपी चुनाभट्टी येथील म्हाडा कॉलनीतील असल्याची माहिती एटीएसला मिळाली. अखेर त्याला शनिवारी कामरान आमीन खान (25) ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने संदेश पाठवण्याचे मान्य केल्यानंतर त्याला उत्तर प्रदेश एसटीएसफच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेनंतर आणखी एक धमकीचा संदेश सोशल मीडिया डेस्कला प्राप्त झाला होता. अटक केलेल्या आरोपीला सोडून द्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशा धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता. याबाबतची माहिती उत्तर प्रदेश एसटीएफने महाराष्ट्र एटीएसला दिली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या मदतीने नाशिक येथील भ्रद्रकाली परिसरातील 20 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला उत्तर प्रदेश एसटीएफकडे सूपूर्त करण्यात आले आहे

Uttar Pradesh social media desk threater arrested form Maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT