मुंबई

मुंबईतील प्रभागांत होणार 'मुंबई फुड स्ट्रीट'; आयुक्तांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी २०० कोटी

समीर सुर्वे

मुंबई, ता.18 : प्रभागातील सहाय्यक आयुक्तांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आगामी वर्षात तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. चालू वर्षापेक्षा तब्बल चारपटीने या निधीत वाढ करण्यात आले आहे.

प्रभागात 'मुंबई फुड स्ट्रीट' सुरु करण्यासही निधी दिला जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या 24 प्रभागातील सहाय्यक आयुक्तांच्या कल्पनेतील प्रकल्प राबविण्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात निधी राखून ठेवला जातो. चालू वर्षात 50 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, कोविडमुळे हा निधी फारसा वापरला गेला नाही. आगामी वर्षात तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

या निधीतून पदपथ, वाहतुक बेटे तसेच उड्डाणपुलाखालील भागाच्या सुशोभीकरणासाठी अनोखी कल्पना साकारण्यात येणार आहे. तसेच, सहाय्यक आयुक्तांच्या कल्पनेतील इतर काही अभिनव प्रकल्पही साकारण्यास हा निधी वापरता येणार आहे.

फुड ट्रकही येणार

मुंबईतील पर्यटन केंद्रावर फुड ट्रक सुरु करण्याचा निर्णयही महानगर पालिकेने घेतला आहे.  त्यासाठी धोरणही तयार करण्यात आले होते. मात्र, कोविडमुळे हे धोरणही मागे पडले.

खाऊगल्ल्या हा मुंबईच्या संस्कृतीचा भाग आहे. प्रत्येक प्रभागात अशा खाऊ गल्ल्या अस्तीत्वात आहेत. या खाऊ गल्ल्याचे नियोजन करणे, स्वच्छता राखणे यासाठीही हा निधी वापरता येणार आहे. पालिकेच्या फेरीवाला धोरणाअंतर्गत खाऊ गल्ल्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यात, रात्रीचा बाजार अशीही संकल्पना आहे. रात्रीच्या वेळीही आठवड्यातील काही दिवस या खाऊ गल्ल्या सुरु ठेवण्यात येणार आहेत. कोविडपूर्व काळात मुंबईतील काही भागातील मॉलमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता. मात्र,कोविड काळात हा प्रयोग बंद झाला होता.

in various wards of mumbai food street will be created extra 200 crore budget
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT