Vasai Murder Case esakal
मुंबई

Vasai Murder Case: 3 वर्षांचे अफेअर, नोकरी अन्... वसईत प्रेयसीला संपवून आरोपी मृतदेहासोबत काय बोलत होता?

Sandip Kapde

वसई शहरातील आरती यादव हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. आरोपी रोहित यादवने आरतीची एवढ्या निर्घृण हत्या का केली?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. वसई हत्याकांडाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून एक माणूल सोडता कोणही आरोपीला रोखले नाहीत. नाहीतर आज आरतीचा जीव वाचला असता. आरोपींना थांबवण्याऐवजी अनेक लोक घटनेचा व्हिडिओ बनवत होते.

आरती यादव आणि रोहित यादव यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी रोहित यादव याने वसईतील गावराईपाडा परिसरात आरतीला कामाला लावले होते. महिनाभरापूर्वी आरोपी रोहित यादवला आरती कुठे काम करते यावरून संशय आला. तिथल्या कुणाशी तरी तिचं अफेअर आहे. यावरून गेल्या महिनाभरापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यामुळे आरतीचे रोहित यादवसोबत ब्रेकअप झाले. त्यामुळे आरोपी चांगलाच चिडला आणि त्याने आरती यादवचा खून केला. रोहित यादव हा हरियाणाचा, तर आरती उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही आधी नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर भागात राहत होते, मात्र नंतर आरतीचे कुटुंब दुसरीकडे स्थलांतरित झाले, वसई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. (Mumbai Crime News)

तेव्हा पोलिसांनी कारवाई केली असती तर...

आरती यादवची बहिण सानिया यादव म्हणाली, "आरोपी रोहित यादव आरतीला गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्रास देत होता. गेल्या शनिवारीही त्याने माझ्या बहिणीला मारहाण केली होती. इतकंच नाही तर रोहितने जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता. यामध्ये आरतीचा मोबाईलही आरोपी रोहितने फोडला. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती, पण पोलिसांनी त्याला (रोहित) बोलावले आणि काही वेळाने सोडून दिले. पोलिसांनी रोहित यादववर कोणतीही कारवाई केली नाही. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, मोबाईल बनवायला फारसा खर्च येणार नाही. माझी बहीण आरती यादवला न्याय मिळायला हवा. "

काल (मंगळवार) नेमकं काय घडलं?

वसईतील गौरीपाडा येथील वर्दळीच्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी भरदिवसा खुनाची घटना घडली. आरोपी रोहित आरतीच्या रक्ताने माखलेल्या शरीराजवळ बसून काहीतरी बडबड करत होता. माहिती मिळताच वसई पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि आरतीचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात नेला. रोहित यादव (२९) असे या व्यक्तीचे नाव असून आरती यादव (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक तपासानुसार, नालासोपारा शहराजवळ राहणारे हे जोडपे गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, पण अचानक रोहितला संशय आला की ती आपली फसवणूक करत आहे.

आरती मंगळवारी (18 जून) सकाळी ती वसईतील एका खासगी कंपनीत कामासाठी घरून निघाली. त्यानंतर संतापलेल्या रोहितने गौरीपाड्यात तिच्याशी बोलून तिचे कोणासोबत संबंध आहेत, अशी विचारणा केली. ती चालत राहीली यावेळी रोहितने हातातील लोखंडी पाना तिच्या डोक्यात घातला. वारंवार वार केल्यामुळे आरती  रक्ताच्या थारोळ्यात पडली. तो काही पावले पुढे गेला आणि मग तो जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी परत आला. तिला जिवंत पाहून त्याने पूर्ण ताकदीने तिच्या मानेवर वार केले आणि आरतीचा मृत्यू होईपर्यंत वार करत राहिला.

यानंतर, तो आरतीच्या मृतदेहाशेजारी बसला आणि म्हणू लागला, "तू माझ्याशी असे का केलेस?" आरतीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.  एका व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, रोहितने त्याला ढकलून दिले. इतर लोकांनी आणखी थोडे प्रयत्न केले असते तर आरती आज वाचली असती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT